*पोलीस केंद्र उस्मानाबाद यांच्या वतीने शनिवार ता. १७ रोजी चालक दिन साजरा करण्यात आला*
उस्मानाबाद/प्रतिनिधी
पोलीस केंद्र उस्मानाबाद यांच्या वतीने शनिवार ता. १७ रोजी चालक दिन साजरा करण्यात आला आहे.
अप्पर पोलीस महासंचालक (वा.) महाराष्ट्र राज्य मुंबई, कुलवंत कुमार सारंगल, अधीक्षक महामार्ग सुरक्षा पथक औरंगाबाद अनिता जमादार ,पोलीस उप अधीक्षक महामार्ग सुरक्षा पथक औरंगाबाद दिलीप टिप्परसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस केंद्र उस्मानाबाद यांच्या वतीने चालक दिन साजरा केला.
त्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर चालक व ट्रान्सपोर्ट यांना पुष्पगुच्छ देऊन व मिठाईचे वाटप करून त्यांचा उचित सन्मान करण्यात आला. तसेच उस्मानाबाद येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ येथील बस चालक यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील सन्मान करण्यात आला.
उस्मानाबाद शहरातील मालवाहतूक करणारे चालक/मालक यांचा एकत्र बोलावून त्यांचा देखील पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही सन्मान करण्यात आला.सर्व ठिकाणी वाहतूक चालक यांना वाहतूक नियमाचे महत्त्व समजावून सांगून वाहतूक नियम काटेकोरपणे पाळणे बाबत प्रबोधन करण्यात आले.
यावेळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अपघात विमा या योजनेचे महत्त्व समजावून सांगून प्रबोधन करण्यात आले. तसेच मृत्युंजय दूत संकल्पनेबाबत सविस्तर माहिती देऊन अपघात झाल्यानंतर अपघात ग्रस्त व्यक्तीला तात्काळ मदत व्हावी याचे महत्व समजावून सांगण्यात आले. वरील सर्व कार्यक्रम हे सहाय्यक पोलीस निरीक्षक निशिकांत शिंदे, उपनिरीक्षक विलास राठोड व महामार्ग पोलीस केंद्र उस्मानाबाद येथील पोलिस अंमलदार बालाजी तोडकर, पोलीस नाईक अमोल तांबे, हनुमान फंड, रविकांत चव्हाण यांनी पार पाडले.