Views


*लोहारा शहरात महिलासाठी शौचालय व मुतारी उभारा-- मनसेची मागणी*



लोहारा/प्रतिनिधी


 शहरात महिलासाठी शौचालय व मुतारी उभारण्याची मागणी, नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांच्याकडे शहर मनसे यांच्यावतीने निवेदनाव्दारे केली आहे.या निवेदनात म्हटले आहे की,लोहारा शहर हे तालुक्याचे ठिकाण असून लोहारा शहरात फक्त एकच स्त्री-पुरुष मुतारी असल्याने महिलांची व गैरसोय होत असल्याने लोहारा शहरात वाढीव महीलासाठी शौचालय व मुतारी बांधून देण्यात यावी, असे म्हटले आहे.याप्रसंगी निवेदन नगरपंचायतचे स्वच्छता निरीक्षक अभिजित गोरे यांच्याकडे देण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब रवळे,तालुका संघटक अजय पवार,मनसेचे शहर उपाध्यक्ष विशाल रोडगे, निवृत्ती थोरात,अभिमन्यू रोडगे,रोहित मोरे,बाबाजी थोरात यांच्या सह अदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top