*विशेष सरकारी वकील नियुक्त करून खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात फाशी ची शिक्षा मागणार- आ. राणाजगजितसिंह पाटील*
उस्मानाबाद/प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील बालिकेवरील अतिप्रसंगाची अमानुष घटना अतिशय संतापजनक व निंदनीय आहे. विशेष सरकारी वकील नियुक्त करून खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात घेण्यात येईल. गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नराधमाला फाशी ची शिक्षा मागणार. मानवतेला काळीमा फासणारी ही घटना असून पोलीस अधीक्षक यांना जलद गतीने दोषारोपपत्र दाखल करण्याचे सूचित केले असुन तपासात आवश्यक पुरावे गोळा करण्यात आले आहेत. पीडितेची तब्येत स्थिर असून योग्य ते उपचार सुरू आहेत. वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून वेळोवेळी तब्येतीची माहिती घेण्यात येत आहे. पीडितेच्या कुटुंबियांशी संपर्क करून त्यांना धीर दिला असून सर्वतोपरी मदत केली जाईल. घटनेचं गांभीर्य लक्षात घेतां पोलीस अधीक्षक यांना विशेष सरकारी वकील नियुक्तीचा प्रस्ताव राज्य सरकार कडे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेष सरकारी वकील नियुक्त करून खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात घेण्याची कारवाई देखील करण्यात येणार आहे. गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नराधमाला विशेष सरकारी वकीलांकडुन फाशी ची शिक्षा मागण्यात येईल.