*अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची तात्काळ चौकशी करुन प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवुन आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी--लोहारा शहरातील नागरिकांची मागणी*
लोहारा/प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची तात्काळ चौकशी करुन सदरील प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवुन आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी, अशा मागणीचे निवेदन लोहारा शहरातील नागरिकांनी तहसीलदार यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, तुळजापूर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर याच गावातील एका व्यक्तींने अत्यंत घृणास्पद व पाशवी कुकर्म व अत्याचार केला आहे. सदरील गुन्ह्याची तात्काळ चौकशी करुन सदर प्रकरण फास्ट टृॅक कोर्टात चालवुन आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी. जेणे करुन समाजात वावरत असलेल्या अशा विकृत माणसिकतेच्या लोकांवर कायदा व सुव्यवस्थेचा धाक बसेल भविष्यात अशा प्रकारचे लांच्छनास्पद व घृणास्पद कृत्य करणार नाहीत. तरी या आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. या निवेदनावर जिल्हा सहकार बोर्ड संचालक तथा नगरसेवक अविनाश माळी, बाळासाहेब पाटील, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे, रोहयो चे माजी चेअरमन आयुब अब्दुल अब्दुल शेख, शब्बीर गवंडी, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, के.डि.पाटील, भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य कमलाकर सिरसाट,
पत्रकार महेबुब फकिर, नयुम सवार, शेरु मासुलदार, आयाज सवार, नजीर शेख, बाळासाहेब कोरे, शमीउल्ला पठाण, जावेद भोंगळे, रियाज तांबोळी, सरफराज इनामदार, सोयब सय्यद, खाशिम फकिर, अदी, उपस्थित होते.