Views*उमरग्यात वहानांसाठी सीएनजी गॅस पाँईटची सुविधा सुरू*लोहारा/प्रतिनिधी

उमरगा शहर व परिसरातील सीएनजी गॅस वाहनधारकांना सीएनजी गॅस पाँईटची सुविधा उमरगा बायपास मार्गावरील राजधानी हॉयवे सर्विसेस (अत्तार पेट्रोल पंप) येथे सुरू करण्यात आली आहे. बुधवारी दि.17 ऑगस्ट रोजी सांयकाळी शिवसेनेचे माजी खासदार प्रा.रविंद्र गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक एल.टी.मोरे होते.इंडियन ऑईल कंपनीचे विभागीय व्यवस्थापक जी.के.देशमुख (सोलापूर), अशोका गॅस एजन्सीचे लातूर - उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रमुख महेश बिलुगट्टी, सीएनजीचे प्रकल्प व्यवस्थापक स्वप्नील गुरव, वसंत कुमार, रोहित बाहेती, दर्पण वाघ, लालासाहेब शितोळे, बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे, भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव गुरव, मुरूमचे माजी नगराध्यक्ष रशीद शेख, मोटार मालक संघटनेचे अध्यक्ष महेबूब सुलतान, माजी नगरसेवक विवेक हराळकर, वहाब अत्तार, रवि चिंचोळे,वंचित बहुजन आघाडीचे राम गायकवाड, महाविर कोराळे,मधुकर यादव, सलीम अत्तार,मौलाना अयुब,अस्लम शेख, जाहेद मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी बोलताना प्रा.गायकवाड म्हणाले की, सीएनजी गॅस अभावि वहानधारकांची गैरसोय होत होती. राजधानी हायवे सर्विसेच्या वतीने  ही सोय उपलब्ध करुन दिले आहे. कंपनीने ग्राहकांना वेळेत गॅस पुरवठा करुन वेळेला महत्व द्यावे. इंडियन ऑईल कंपनीचे देशमुख,शिंदे यांची भाषणे झाली. राजधानी हॉयवे सर्विसेस मालक अब्दुल रज्जाक अत्तार यांनी प्रास्ताविक यांनी केले. मनोज जाधव यांनी सूत्रसंचलन केले तर सुभाष जेवळे यांनी आभार मानले.
 
Top