Views
*सोजर मतिमंद निवासी शाळेत ७५ वा स्वातंत्र अमृत महोत्सव दिन साजरा.* 
    

कळंब/ प्रतिनिधी

शहरातील सोजर शाळेत ७५ वा स्वातंत्र दिन साजरा करण्यात आला. दिनांक १३,१४,व १५ असा तीन दिवस ध्वाजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला. १५ रोजी अमृत महोत्सवी ७५व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेमध्ये कळंब तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा पत्रकार विलास मुळीक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन गरड , शहरातील व्यापारी अनिल लोढा, गणी पठान, विद्यार्थीचे पालक श्री घाडगे, श्री पवार श्री शेख 
उपस्थित होते. तर यावेळी संस्थेचे अर्जुनसिंह बारबोले हे प्रमुख पाहुणे म्हणून यांची विशेष उपस्थिती होती . शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये शाळेचे क्रीडाशिक्षक महादेव शिनगारे यांनी मुलांनाकडुन झेंडा कवायत करुन घेतली. तसेच शाळेतील कला शिक्षक नितीन सुरवसे यांनी चित्रकला व रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यात प्रथम येणाऱ्या मुलांना बक्षिस मान्यवराच्या हस्ते वितरण करण्यात आले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय थोरे यांनी केले. शाळेचा अहवाला वाचणं चांगदेव शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन गरड यांनी मानले. कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
 
Top