Views


*शिवसेना शिंदे गटाच्या उस्मानाबाद जिल्हा प्रमुख पदी मोहन पणुरे, लोहारा तालुका प्रमुख पदी जगन पाटील, उमरगा तालुका प्रमुख पदी बळीराम सुरवसे यांची निवड*
लोहारा/प्रतिनिधी


हिंदु हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते यांच्या आदेशानुसार शिवसेना शिंदे गटाच्या उस्मानाबाद जिल्हा 
 प्रमुख पदी शिवसेनेचे लोहारा तालुका प्रमुख असलेले जेवळी येथील सरपंच मोहन पणुरे, लोहारा तालुका प्रमुख पदी जगन पाटील, उमरगा तालुका प्रमुख पदी बळीराम सुरवसे यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई येथील कार्यालयात दि.17 ऑगस्ट 2022 रोजी उमरगा,लोहारा मतदार संघाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या उपस्थितीत शिवसेना सचिव संचय मोरे यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले. यावेळी बालाजी किणीकर, आप्पासाहेब पाटील, उपस्थित होते. या निवडीबद्दल यांचे जिल्ह्यातुन व तालुक्यातुन अभिनंदन करण्यात येत आहे.
 
Top