Views


*पिक विमा योजनेस मुदतवाढ द्या - राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी*

 कळंब /प्रतिनिधी 


तालुक्यातील शेतकरी हे सततच्या पावसामुळे व सोयाबीन या पिकावरील गोगलगायच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी बांधव हैराण झालेला आहे.यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची दुबार,तिबार पेरणी केलेली आहे. या कामामुळे शेतकऱ्यांना विमा भरण्यासाठी विमा भरण्यासाठी वेळच मिळालेला नाही आणि विमा भरण्याची अंतिम मुदत १ ऑगस्ट २०२२ ची आहे.यामुळे बरेच शेतकरी विमा भरण्यापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत मिळणार नाही.त्यामुळे याचा गांभीर्याने विचारपूर्वक निर्णय घेऊन सोयाबीन पिकाचा प्रधानमंत्री पिक विमा भरण्यासाठी मुदत वाढवून देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन दि.१ ऑगस्ट २०२२ रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आले आहे.
या निवेदनात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष मुसद्देक काझी,तालुका कार्याध्यक्ष सुरेश टेकाळे,युवकचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार पवार,तालुका कार्याध्यक्ष उमेश मडके,उपाध्यक्ष राहुल बोंदर,राष्ट्रवादी युवक सामाजिक न्याय विभाग राहुल कसबे,पत्रकार प्रदीप यादव यांनी उपविभागीय अधिकारी यांचे वरिष्ठ लिपिक दिनेश मंडलिक यांच्याकडे निवेदाव्दारे शासन स्तरावर मागणी केली आहे.

 
Top