Views


*मलकापूर येथील लोमटे महाराज यांना अटक करण्याची अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी*कळंब/प्रतिनिधी 


तालुक्यातील मलकापूर येथील एकनाथ सुभाष लोमटे यांनी महिला त्यांची भक्त म्हणून दर्शनासाठी गेली असता तिला एकटीला खोलीत बोलावून शरीर सुखाची मागणी केली . तिने विरोध दर्शविला तरीही तिच्याशी जे घडले ते या महिलेने पोलिसा समोर दिलेल्या फिर्यादीत कथन केलेली हकीकत अतिशय गंभीर आहे . यात त्या बाबाने तिला सांगितले आहे की , तू यागोदर आली तेव्हा तुला पेढा खायला दिला होता तू झोपली होती तेव्हा मी तुझ्यावर बलात्कार केला होता त्याची व्हिडिओ क्लिप माझ्याकडे उपलब्ध आहे ती मी व्हायरल करेन अशी धमकी देवून तिच्या हाताला पकडुन स्वतः कडे ओढून तिच्या छातीस धरून झोंबाझोंबी केली तिने ओरडल्यामुळे ती वाचली तरीही तिला जीवे मारण्याची धमकीही दिली आहे .      
     
    याच भोंदू बाबावर याआगोदर येरमाळा पोलिस ठाण्यात जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद झाला आहे . सदर मठात अंधश्रध्देला खतपाणी घालणारे अनेक प्रकार चालतात . दैवी चमत्काराचा दावा केला जातो . अज्ञानी , दैववादी सामान्य लोकांची फार मोठ्या प्रमाणात अक्षरशः लूट केली जाते . या गंभीर प्रकरणाची कसून चौकशी करून त्यांचेवर जादूटोणा प्रतिबंध कायदा प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचा मठ नोंदणीकृत आहे का ? बांधकाम परवाना घेतला आहे का ? ती जमीन अकृषी केली आहे का ? तिथे जे गैर प्रकार चालतात याची पोलिस निरीक्षक यांच्या किंवा त्यांच्या वरील अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी करावी पोलिसांना विचारले असता तो फरार असल्याचे सांगण्यात आले . त्यामुळे ते पुरावे नष्ट करण्याची श्यक्यता आहे . तिला दैवी दहशत , भीती घालून किंवा त्याच्या भक्ता करवी त्या महिलेची तक्रार मागे घेण्यासाठी दबाव तंत्र वापरू शकेल म्हणून त्याला तत्काळ अटक करून तपास करावा अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात येत आहे . येवढे घडूनही त्याला अटक झाली नाही तर नाईलाजास्तव राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल याची नोंद घ्यावी आणि होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील. अशी मागणी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे करण्यात आली 

  यावेळी निवेदनावर मअंनिस उस्मानाबाद जिल्हाकार्याध्यक्ष श्री.अरविंद शिंदे,जिल्हा प्रशिक्षण विभाग, बालाजी राऊत, कळंब तालुका अध्यक्ष सुरेश धावारे , प्रधान सचिव संतोष लिमकर, उपाध्यक्ष प्रा.ईश्वर राठोड, सुर्यवंशी दीपक, कसबे सोमनाथ, गुंडरे दादाराव, सिद्धार्थ कांबळे,दत्ता भांडे,संदीप सूर्यवंशी,खरात विनोद,चंदनशिवे समाधान यांच्या सह्या होत्या.

 
Top