*अमृत महोत्सवानिमित्त कळंब शहरात १०७५ फुट लांबीच्या तिरंगा ऐतिहासिक पदयात्रा*
*भारत माता की जय,वंदे मातरम्, राष्ट्र पर जय घोषणाने कळंब नगरी दुमदुमली*
कळंब/प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शनिवारी (दि.13) रोजी सकल कळंबकरांच्या वतीने, तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही पदयात्रा एक ऐतिहासिक बनली आहे. असे कळंब शहरात बघण्यास मिळाली असून या तिरंगा पदयात्रेचे राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे.
७५ व्या स्वातंत्र्य दिनाचा अवचित्य साधून १०७५ फुट लांबीच्या तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेला कळंब तालुक्यातील सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी,पदाधिकारी शाळा, महाविद्यालयाचे कर्मचारी, विद्यार्थी तसेच हजारोंच्या संख्येने कळंबकर यांच्या सह तालुक्यातील ग्रामीण भागातील जनता सामील झाले होते. १०७५ फुट लांबीचा तिरंगा विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम् , अमृत महोत्सवाचे विजय असो अशा जयघोष करीत कळंब नगरी दुमदुमून गेली.
तिरंगा पदयात्रा ही सकाळी १०:०० वाजता ढोकी रोड येथील विद्याभवन शाळेच्या प्रांगणातुन सुरू होवून छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नवीन सराफ लाईन ,मेन रोड, राजमाता अहिल्याबाई होळकर चौक मार्गे जाऊन शहिद स्मारक येथे राष्ट्रगीताने तिरंगा पदयात्रेचे संगता झाली.
पोलिस प्रशासनाकडून कळंब पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांनी जातीने लक्ष देत पोलिस कर्मचाऱ्या कडून वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवली