Views




*अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,जनकल्याण समिती भारतमाता मंदिर लोहारा व विद्यार्थी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात 1111 फूट तिरंगा ध्वजाची भव्य पदयात्रा संपन्न*


लोहारा/प्रतिनिधी


या वर्षीचा स्वातंत्र्य दिवस हा देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा होतोय,मा.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात हर घर तिरंगा हे अभियान राबविण्याचे जाहीर केले आहे.75 वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियान अंतर्गत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,जनकल्याण समिती भारतमाता मंदिर लोहारा व विद्यार्थी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने लोहारा शहरात दि.13 ऑगस्ट 2022 रोजी 1111 फूट तिरंगा ध्वजाची भव्य पदयात्रा काढुन मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली.

या पद्यात्रेचे उद्घाटन तहसीलदार संतोष रुईकर व माजी सैनिक आनंद सूर्यवंशी,जनकल्याण समितीचे सहकार्यवाह अँड.गिरीष पाटील,जनकल्याण समितीचे पुर्ण वेळ कार्यकर्ते शंकर जाधव,निखिल शेंडगे यांच्या हस्ते भारतमाता मंदिरातील भारतमातेच्या मूर्तीचे पूजन करून करण्यात आले.या पदयात्रेत शहरातील हायस्कूल लोहारा, वसंतदादा पाटील हायस्कूल,स्व. भानुदासराव चव्हाण महाविद्यालय,न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल,आदी शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


यावेळी प्राचार्या उर्मिला पाटील,प्राचार्य शहाजी जाधव, प्राचार्य दौलतराव घोलकर,उपप्राचार्य यशवंत चंदनशिवे, मुख्याध्यापक वसंत राठोड,अभिमान खराडे,नगरसेवक तथा जिल्हा बोर्ड संचालक अविनाश माळी,पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे,रोहयो माजी चेअरमन आयुब शेख,युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार,ओम कोरे, नगरसेवक विजय ढगे,भाजपा जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेटटी,भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, भाजपा ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष दगडु तिगाडे,भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य कमलाकर सिरसाठ,प्रमोद पोतदार,शिक्षक गोपाळ सुतार,प्रा.राजपाल वाघमारे,सुखदेव पांढरे, धनराज धनवडे,वैजिनाथ पाटील,अभिजित सपाटे, मल्लिनाथ चव्हाण,बळवंत कांबळे,व्यंकटेश पोतदार, शुभांगी कुलकर्णी,रत्नमाला पवार,अंजली पटवारी, स्नेहलता करदोरे,विजयाताई पाटील,माजी सैनिक राजेंद्र सूर्यवंशी, इंद्रजित सूर्यवंशी, श्रीनिवास माळी, मनोज तिगाडे,विरेश स्वामी,दत्ता पोतदार, आदेश माळवदकर, सुमित शिरसागर अमित बोराळे,अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे रोहित लोळगे,सूरज भोसले, आकाश भुजबळ, संजय मुर्टे,उत्तम पाटील,अप्पू स्वामी, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.हि तिरंगा पदयात्रा भारतमाता मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक,डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,जगदंबा मंदिर,आझाद चौक, शिवनगर,तहसील कार्यालय,रजिस्ट्री कार्यालय, महात्मा फुले चौक,जेवळी रोड मार्गे काढण्यात आली.स्व. भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात या पदयात्रेचे समारोप लोहारा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे यांच्या मार्गदर्शनाने व राष्ट्रगीताने करण्यात आले.

 
Top