Views


*ईटकूर परिसरात आंगणवाडी यांच्या वतीने ठिकठिकाणी ध्वजारोहण*

कळंब/प्रतिनिधी 

 आजादी का अमृतमहोत्सव २०२२ " हर घर तिरंगा "या कार्यक्रमांतर्गत ईटकूर येथे परिसरातील एकात्मिक बालविकास योजना प्रकल्पाच्या सर्व आंगणवाडयामध्ये कार्यकर्ती , मदतणीस यांनी तर कांही ठिकाणी प्रतिष्ठीत मंडळी , लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते ध्व्जारोहन करण्यात आले. एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्पाच्या तालुका प्रकल्प अधिकारी वैशाली सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व् बिट प्रमुख आगंनवाडी पर्यवेक्षिका संगीता सावंत यांच्या सहकार्यानि तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण मोठ्या आनंदाने करण्यात आले .या वेळी आंगणवाडी मध्ये मा.गांधी, डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून ध्वजारोहण करण्यात आले .
 

यावेळी आंगणवाडी च्या कार्यकर्ती उषाताई ओव्हाळ, सुनीता रणदिवे,सुलावती रणदिवे,कस्तुरबाई अस्वले,आम्रपाली शिंदे,जयश्री शिंदे,प्रभावती कुंभार,संध्या रणदिवे,पल्लवी लोंढे,कौशल्या कदम,आश्विनी शिंदे,अनिता शिंदे,कोमल कदम, प्रतिभा गंभीरे यांचीउपस्थिती होती .संपन्न कार्यक्रमास प्रशालेतील शिक्षक्,विध्यार्थी, सामाजिक युवा कार्यकर्ते व् जेष्ठ नागरिक आदिंची यावेळी उपस्थिती होती .

 
Top