Views

*लोहारा शहरातून श्री बसवेश्वर गणेश मित्र मंडळाच्या वतीने गणेश मुर्तीची बर्ची व ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक*लोहारा/प्रतिनिधी
  
शहरातील  श्री बसवेश्वर गणेश मित्र मंडळाच्या वतीने गणेश मुर्तीची दि.31ऑगस्ट 2022 रोजी शहरातुन बर्ची व ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढुन स्थापना करण्यात आली. यावर्षी या मंडळाच्यावतीने पर्यावरण पुरक असणाऱ्या चांदीच्या गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्यापुर्वी लोहारा शहरातील जगदंबा मंदिर ते डॉ.बासाहेब आंबेडकर चौक मार्गे महात्मा फुले चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पासुन गणेश मंडळाच्या स्टेजपर्यत ढोल ताशा च्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. लोहारा तालुक्यातील हराळी येथील ज्ञाप्रबोधनीच्या बरची पथकाने यावेळी उपस्थितांचे लक्ष वेधले. या मिरवणूकीत अध्यक्ष वैजीनाथ माणीकशेट्टी, उपाध्यक्ष संतोष फावडे, सचिव रामेश्वर वैरागकर, शशांक पाटील, प्रसाद जट्टे, दयानंद स्वामी, धनराज फरीदाबादकर, रवी नरुणे, गणेश हिप्परगेकर, विरेश स्वामी, योगेश स्वामी, आपु स्वामी, विरभद्र फावडे, विजय स्वामी, सचिन स्वामी, वैभव माणीकशेट्टी, सुमित फावडे, सागर स्वामी, राजेंद्र स्वामी, पापु बोराळे, प्रविण संगशेट्टी, प्रशांत माळवदकर, बाळू माशाळकर, आदी उपस्थित होते.


 
Top