Views


*मुसळधार पावसाने लोहारा खुर्द येथील द्वारका नदीवरील ब्रिज वाहून गेला*
लोहारा/प्रतिनिधी


तालुक्यातील लोहारा खुर्द येथे काल दि.30 ऑगस्ट 2022 रोजी रात्री पडलेल्या मुसळधार पावसात द्वारका नदीवरील पूल वाहून गेले, यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झालेली आहे. सोयाबीन मधील मशागत व इतर पिकातील मशागत करण्यासाठी साधन घेऊन जाण्यास बाधा निर्माण झाली आणि भविष्यात च काम शेतीतील मशागत करण्यासाठी अवजारे बैलगाडी इतर शेतीपूरक वाहनेघेऊन जाण्यासाठी किंवा ऊस कारखान्याला ऊस घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यासमोर खूप मोठी समस्या निर्माणण झालेली आहे सदर पूल हे द्वारका नदीवर द्वारका नदीवर असून दोन वर्षापासून दोन वर्षापासून या पुलाचे काम पेंटिंग असून प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी लोकसहभागातून पैसे जमा करून सदर पुलाची दुरुस्ती तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आली होती तरी सदर पूल काल झालेल्या मुसळधार पावसामुळे वाहून गेला पुन्हा एकदा्या पदरी संकट निर्माण झाले तरीऊन प्रशासनाने वेळेवर दखल घेऊन शेतकऱ्यांची समस्याचे निवारण करावे, अशी मागणी होत आहे.

 
Top