Views


*कळंब येथे बंधन कोनगर संस्था ठरते निरधारानचा आधार.*

 कळंब/प्रतिनिधी 

 गेल्या दोन वर्षापासून लॉकडाऊनमुळे सर्व उद्योग व्यवसाय बंद असल्याने कष्टकऱ्यांचे जगणेही जिकीरीचे झाले. रोजगार नसल्याने अनेकांना घरातील दैनंदिन खर्च भागवणेही अवघड झाले.त्यातच विधवा, घटस्फोटित,निराधार महिलांना तर असंख्य अडचणींचा सामना करावा लागत होता.कोरोना,लाॅकडाउन यामुळे महिलांना हातमजूरी मिळत नव्हती.खेड्या पाड्यात रोजगार बंद झाले. यामुळे लोकांची परिस्थिति बिघडत होती,यात विशेष करून विधवा,घटस्फोटित,निराधार गरीब महिला यांच्यावर मोठा परिणाम झाला होता. या महिलांना मदत करण्याकरिता पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी म्हणुन बंधन सामाजिक संस्थेने महिलांना कपडे,किराणा किट शिलाई मशीन तसेच पिठाची गिरणी साहित्य देण्यात आले. उस्मानाबाद जिल्ह्य़ात दुष्काळ व मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो त्या जिल्ह्य़ातील महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्याची निवड बंधन कोननगर संस्थेनी केली त्यानुसार उस्मानाबाद जिल्ह्य़ात १५ ठिकाणी काम करत आहे ही संस्था दोन वर्षे या जिल्ह्य़ात काम करणार आहे त्यानुसार जिल्ह्यात १५ शाखेतून ३००० महिलांना ज्यांच्या घरी कर्ता पुरुष नाही ज्या महिला विधवा परित्यक्ता निराधार अपंग पती आहेत अशांना स्वयंरोजगार उपलब्ध करण्यासाठी गावाचा भौगोलिक अभ्यास करून लघु व्यवसाय सुरू करण्यासाठी मदतीचा हात म्हणून बंधन कोननगर संस्था कळंब शाखेच्या वतीने ज्या महिलांना गरज आहे अशा महीलांचा सर्वे करुन उस्मानाबाद तालुक्यातील गरजू महिलांना बंधन संस्थेच्या माध्यमातून शिलाई,
मशीन, पिठाची गिरणी, बांगडी, चप्पल, स्टेशनरी, भाजीपाला स्टॉल, ब्युटी पार्लर असे अनेक स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत या सर्व महिलांना व्यवसाय कसा करायचा याचे ३ दिवसाचे प्रशिक्षण बंधन कोननगर संस्थेच्या वतीने देण्यात आले व प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उस्मानाबाद शाखेतून 
22 /8/2022 रोजी बंधन उस्मानाबाद शाखेतून विधवा व निराधार 30 महिलांना पिठाची गिरणी साहित्य वाटप करण्यात आले. साहित्य वाटप वेळी प्रमुख उपस्थिती म्हणुन 
तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती कळंब, उस्मानाबाद, कार्यालयाचे तालुका अभियान व्यवस्थापक सचिन ठोकळ सर , MIS विलास ताटे सर, FI संभाजी खांडेकर अणि प्रभाग समन्वयक बापू वाघमारे या मान्यवरांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले 
या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी , बंधन कोननगर संस्थेचे, एरिया काॅर्डिनेटर बिधान सहा तसेच बंधन कोननगर संस्थेचे शाखा मॅनेजर प्रज्ञावंत रणदिवे आणि कार्यालयाचे इतर कर्मचारी उपस्थित होते.
 
Top