Views


*दलाला सह तहसीलदारला 20,000/- लाच घेताना रंगेहाथ पकडले*

उस्मानाबाद/प्रतिनिधी

उमरगा तहसील कार्यालयाचे तहसीलदारास 20,000/- रूपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. वाळूच्या ट्रक वर कार्यवाही न करण्यासाठी मध्यस्थी मार्फत 20,000/- रूपये स्वीकारताना उमरगा तहसील चे तहसीलदार राहुल मधुकर पाटील वय.48 यांना बुधवार (दि.24) रोजी उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले 
     
    तक्रारदार यांना त्यांच्या शेतामध्ये घराचे बांधकाम करायचे असल्याने त्यांना चार ट्रक वाळूची आवश्यकता होती.म्हणून तक्रारदार हे आज रोजी पंचांसह लोकसेवकाची भेट घेण्यासाठी त्यांचे शासकीय निवासस्थानी जाऊन याबाबत त्यांना बोलले असता लोकसेवक यांनी मध्यस्थी मार्फत चार ट्रक वाळू घेण्यासाठी व त्या वाहनावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांना एका ट्रकला 5000/- रुपये प्रमाणे चार ट्रक वाळूसाठी 20,000/- रुपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले व 20,000/- लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली.

सदर कार्यवाही औरंगाबाद लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक मा. डॉ. राहुल खाडे व अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद लाचलुचपत विभागाचे पोलिस उपाधिक्षक प्रशांत संपते यांच्या पथकाने केली पथकामध्ये पोलिस अंमलदार दिनकर उगलमुगले, विष्णु बेळे, विशाल डोके, जाकेर काझी यांनी कार्यवाही केली.



*उस्मानाबाद जिल्ह्यातील कोणी लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा*


प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र. वि. उस्मानाबाद
मो.नं. 9527943100

श्री अशोक हुलगे,पोलीस निरीक्षक,
ला.प्र. वि. उस्मानाबाद
मो.नं.8652433397

विकास राठोड,पोलीस निरीक्षक,
ला.प्र. वि. उस्मानाबाद
मो.नं. 7719058567
कार्यालय 02472 222879

 
Top