Views

*ढोकी नाका ते बाबा नगर या भागातील सिमेंट रस्त्याचे काम तात्काळ सुरु करण्याची काॅग्रेस कडून मागणी*


कळंब/प्रतिनिधी

शहरातील ढोकी नाका ते बाबा नगर या भागातील सिमेंट रस्त्याचे काम तात्काळ सुरु करण्यासाठी कळंब तालुका काँग्रेस आयचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार यांच्या वतीने उपविभागीय अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे.गेल्या तीन ते चार महिन्यांपूर्वी ढोकी रोड ते बाबानगर या सिमेंट रस्त्याचे काम चालू करण्यासंदर्भात कार्यारंभ आदेश देण्यात आले आहे.मात्र संबंधित ठेकेदाराने आजपर्यंत त्या ठिकाणी कसल्याही प्रकारच्या कामास सुरुवात केलेली नाही.त्यामुळे बाबा नगर व डिकसळ भागातील नागरिकांचे अतिशय हाल होत असून शासनाने निधी देऊन सुद्धा काम सुरु केलेले नाही.सदरील काम हे आठ दिवसात सुरु न केल्यास कळंब तालुका काँग्रेस आयच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या निवेदनावर काँग्रेस तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, उस्मानाबाद कळंब विधानसभा अध्यक्ष शशिकांत निरफळ,उस्मानाबाद कळंब विधानसभा उपाध्यक्ष रोहित कसबे, काँग्रेसचे अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष शहाजहान शिकलकर शहर कार्याध्यक्ष सचिन गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
 
Top