Views


*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोघा खुर्द येथे स्वातंत्रदिन उत्साहात साजरा*


लोहारा/प्रतिनिधी


लोहारा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोघा खुर्द येथे शाळेसह गावात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अमृतमहोत्सवानिमित्त शाळेत चित्रकला स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,रंगभरण स्पर्धा आयोजन करण्यात आले होते.तसेच शाळा,अंगणवाडी येथे तीन दिवस ध्वजारोहण करण्यात आले.

स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये चिमुकल्यांनी तिरंगी ध्वजासह,तिरंगी फुगे घेऊन तर मोघा ग्रामस्थांनी हर घर तिरंगा फडकावुन अमृतमहोत्सवात उस्फुर्त सहभाग नोंदविला.सुरवातीला एकलव्य वाचनालय मोघा खुर्द येथे शाळेचे मुख्याध्यापक विकास घोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर अंगणवाडी येथे ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोघा खुर्द येथे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोहन गोरे, मुख्याध्यापक विकास घोडके, ग्रामपंचायत सदस्य शिवराज पाटील,पोलीस पाटील कुंडलिक पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी शाळेतील चिमुकले कार्तिक सोनटक्के,आदिती पाटील,आन्यन्या भोंडवे,चैत्राली भोंडवे, अजिंक्य भोंडवे,यश सोनटक्के, सावन मुजावर यांनी मनोगत व्यक्त केले.ध्वजारोहणानंतर माजी सैनिक रावण पवार व प्रभाकर भोंडवे यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहशिक्षक उषा बर्डे,शालेय पोषण आहार कर्मचारी हमीद मुजावर,रईसा मुजावर,गंगाराम भोंडवे, गणेश बाबळे यांनी परीश्रम घेतले.या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे लक्ष्मण भोंडवे,चॉंद मुजावर,सुरेखा भोंडवे,अश्विनी बाबळे,उपसरपंच वंदना गरगडे,ग्रामपंचायत सदस्य शहाजी दळवे,कालींदा मत्ते,रेखा दळवे,जिजाबाई गोरे शैला गोरे,अनिता बाबळे,मनिषा गोरे,अंकुश बाबळे, विलास गरगडे,नितीन गोरे,महादेव पाटील,बालाजी बाबळे, बिरु सोनटक्के,राघवेंद्र भोंडवे,संजय भोंडवे,दादा पवार, प्रशांत गोरे,मुस्तफा मुजावर,शाहुराज सावळे,अमोल पाटील,विश्वनाथ मत्ते,गोपाळ गोरे,बालाजी सोनटक्के, हणमंत भोंडवे,सतिश मत्ते, रामचंद्र मत्ते,महादेव भोंडवे, सुशांत शिंदे,पांडुरंग सोनटक्के,शहाजी भोंडवे,विक्रम गोरे,शरद भोंडवे, संभाजी तडोळे,विशाल गोरे यांच्यासह नागरीक,महीला,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top