Views


*दबडे यांना कै.स्वा.सैनिक साहेबराव जगताप गौरव समितीच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार*लोहारा/प्रतिनिधी


लोहारा तालुक्यातील भातागळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक व करजखेडा येथील रहिवासी तानाजी दबडे यांना कै.स्वा.सैनिक साहेबराव जगताप गौरव समिती भातागळी यांच्यावतीने भारतीय स्वातंञ्याचा अमृत महोत्सव दिनाचे औचित्य साधुन दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.या कार्यक्रमासाठी गौरव समिती अध्यक्ष,सचिव,गावचे सरपंच,उपसरपंच,ग्रा.प सदस्य,तंटामुत्त अध्यक्ष, सोसायटी चेअरमन,पोलिस पाटील,तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी ताई,सामाजिक कार्यकर्ते,पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ सदस्य,प्रा.शा व प्रशाला भातागळी मुख्याध्यापक,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, यांच्यासह सर्व शिक्षक,विद्यार्थी,पालक,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी दहावी गुणवत्ता यादित आलेले विद्यार्थी तसेच विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला
 
Top