Views


*भारतीय स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोटार सायकल रॅली* 


कळंब/प्रतिनिधी 

तालुका यांच्यावतीने मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ढोकी नाका कळंब येथून शेकडो मोटार सायकल स्वारांनी सहभाग नोंदविला, मोटरसायकलीवर असणाऱ्या तिरंग्या झेंड्यामुळे सर्व वातावरण नयनरम्य व देशभक्तीयम झाले होते यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम यासारख्या देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. ही मोटार सायकल रॅली पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जाऊन चौकात कळंब शहराच्या इतिहासातील सर्वात मोठा तिरंगा ध्वज मा.आ.राणाजगजीतसिंह पाटील यांच्या शुभहस्ते फडकवण्यात आला 


यावेळी भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, शहराध्यक्ष संदीप बावीकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रशांत लोमटे, युवा मोर्चा शहराध्यक्ष रोहित कोमटवार, रामहरी शिंदे अरुण चौधरी, मीनाज शेख, बजरंग शिंदे, संतोष कस्पटे, भगवान ओव्हाळ, प्रवीण कापसे, हरिभाऊ शिंदे,इम्रान मुल्ला,शिवाजी बाराते, शंकर यादव,नागजी घुले, माणिक बोंदर,संजय जाधवर यासह भारतीय जनता पार्टी चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top