*गणेश मंडळांनी शासनाच्या निर्देशानुसार नियमांचे पालन करुन गणेशोत्सव शांततेत साजरा करावा -- प्रभारी पो.नि.सुनिलकुमार काकडे*
लोहारा/प्रतिनिधी
गणेश मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शासनाच्या निर्देशानुसार प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुन गणेशोत्सव शांततेत साजरा करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी पो.नि.सुनिलकुमार काकडे यांनी केले. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने लोहारा पोलिस ठाण्यात दि.27 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी प्रभारी पो.नि.सुनिलकुमार काकडे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रभारी पो.नि.काकडे म्हणाले कि, शहरातील व तालुक्यातील गणेश मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रक्तदाब शिबिर, वृक्ष लागवड, विविध स्पर्धा, पर्यावरण संबंधीत असे विविध सामाजिक उपक्रम राबवुन गणेश उत्सव शांततेत साजरा करावा, असे उपक्रम राबविणाऱ्या गणेश मंगळाना 5 लाखांपर्यंत चे बक्षीस देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी अभिमान खराडे, नगरसेवक जालिंदर कोकणे, ओम पाटील, वैजिनाथ माणिकशेटटी, गगन माळवदकर, स्वप्नील माटे, प्रेम लांडगे, महेश कुंभार, शिवा सुतार, रतन पोतदार, नागेश बिराजदार, जयशिंग बंडगर, यांच्यासह शहरातील व तालुक्यातील गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.