*शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदेव मोहेकर गुरुजींचे कार्य उल्लेखनीय - प्राचार्य डॉ.बाबासाहेब गोरे*
कळंब/प्रतिनिधी
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी आपल्या ध्येय आणि प्रचंड त्यागातून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानप्रसारक मंडळ ही संस्था उभी केली, त्यामुळेच आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली असून त्यामुळेच सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे.ज्यांच्या स्वतःच्या नावामध्ये ज्ञान, ज्यांच्या संस्थेच्या नावामध्ये ज्ञान,ज्यांच्या संस्थेच्या बोधवाक्यात ज्ञान ज्यांनी ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचवली ते मराठवाड्याचे साने गुरुजीचं ठरतात. आयुष्यभर शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणारे मोहेकर गुरुजी शैक्षणिक क्षेत्रातील दीपस्तंभ असून त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे’,असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे यांनी केले.
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पूज्य ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या ३१ व्या स्मृतिदिनानिमित्त गुणवंत विद्यार्थी,आदर्श शिक्षक,निवृत्त कर्मचारी सत्कार व उपहारगृह आणि नूतन वर्गखोल्यांचे उद्धाटन समारंभात अध्यक्षीय समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे ( सचिव, कृष्णाई शिक्षण प्रसारक मंडळ, लातूर ) बोलत होते.
तर प्रमुख अतिथी डॉ. महेंद्र कदम (प्राचार्य विठ्ठलराव शिंदे महाविद्यालय, टेंभुर्णी जि. सोलापूर ) हे म्हणाले,” जागतिकीकरणाच्या काळात आजची पिढी ही स्वतंत्रपणे विविध क्षेत्रात काम करायला लवकर तयार होत नाही, त्यासाठी त्यांच्यात आव्हाने पेलण्याची तसेच स्वावलंबन आणि जबाबदारीची जाणीव व्हायला हवी. तसेच येणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार होणारे बदल आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. मात्र त्याबरोबरच आपले प्रचलित मूल्यसंस्कार जपण्याची सुद्धा तितकीच आवश्यकता आहे.”
यावेळी व्यासपीठावर ज्ञान प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. आबासाहेब बारकुल,उपाध्यक्ष प्रा.अंकुश पाटील,संस्थेचे सचिव माजी प्राचार्य डॉ.अशोकराव मोहेकर, श्री.अनिल बापू मोहेकर,रमेश मोहेकर,ट्रस्टी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर चरिटेबल ट्रस्ट,डॉ.सूर्यकांत जगदाळे,डॉ.डी.एस.जाधव, प्रा. भागवतराव गव्हाणे,श्री प्रकाश शिंदे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील पवार आणि संस्थेचे संचालक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात पूज्य ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या पुतळ्याचे पूजन, दीपप्रज्वलन आणि सांस्कृतिक विभागातील विद्यार्थ्यांच्या स्वागत गीताने करण्यात आली.
प्रास्ताविक संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांनी व्यक्त केले.यावेळी वक्तृत्व स्पर्धेतील पारितोषिक विजेते,विविध परीक्षेत यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. संस्थेतून निवृत्त कर्मचाऱ्याना सेवागौरव ( पुष्पहार, शाल-प्रमाणपत्र व संस्थेचे बोधचिन्ह चांदीची समई ) देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच यावर्षीचे विविध पुरस्कार ज्ञानरत्न उत्कृष्ट माजी विद्यार्थी जयवंत तांबारे,तर ज्ञानदीप हा आदर्श शिक्षक पुरस्कार वरिष्ठ गटातून शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी यांना तर कनिष्ठ गटातून ज्ञानोद्योग विद्यालय येरमाळा येथील प्रा.अमर बारकुल (पुष्पहार, शाल-प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह ) यांना प्रदान करण्यात आले. तसेच उपहारगृह आणि नूतन वर्गखोल्यांचे उद्धाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने डॉ.मुकुंद गायकवाड यांच्या पुस्तकाचे आणि संपादक सुभाष घोडके, अविनाश घोडके यांच्या सा.साक्षी पावनज्योतच्या ( मोहेकर गुरुजी पुण्यस्मरण विशेषांक) साप्ताहिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.यावेळी ऋतिक पटेकर याचे मोहेकर गुरुजींवरील ज्ञानदेव ‘आण्णाच कार्य मोलाच’ हे गीत दाखविण्यात आले. कु. आर्या काकडे, श्री.जयवंत तांबारे व प्रा.संजय मिटकरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.केदार काळवणे,उपप्राचार्य डॉ,.हेमंत भगवान,उपप्राचार्य डॉ.सतीश लोमटे,उपप्राचार्य पंडित पवार, डॉ.के.डी.जाधव, प्रो.ज्ञानेश चिंते, प्रा.अनिल फाटक, प्रा. आर,जी.कारकर,डॉ.संदीप महाजन,डॉ.जयवंत ढोले,प्रा. ईश्वर राठोड, डॉ.नामानंद साठे, डॉ.दीपक वाळके,डॉ.हेमंत चांदोरे,डॉ.श्रीकांत भोसले, डॉ.दत्ता साकोळे,डॉ.सुरेश वेदपाठक,डॉ.नामानंद साठे,डॉ. विश्वजित म्हस्के, प्रा.अक्षय खंडाळे,प्रा.किरण बारकुल,प्रा. मधुकर माने, प्रा.अंजली मोहेकर, प्रा.डॉ.रोहिणी लोहकरे, प्रा.अर्चना मुखेडकर,डॉ. मीनाक्षी जाधव,डॉ.पल्लवी उंदरे, प्रा.जयंत भोसले, प्रा.गोविंद काकडे, प्रा. नंदकिशोर टेकाळे, प्रा. बळीराम गंभीरे,प्रा.आप्पासाहेब मिटकरी, प्रा.एच.जे.काझी,प्रा.विलास जगताप,प्रा.बापूराव शेळके, प्रा. गणेश आडे, प्रा.प्रताप शिंदे, प्रा. महेश मडके, प्रा.रुपेश मानेकर, श्री.अर्जुन वाघमारे,श्री.रमेश भालेकर,श्री.अरविंद शिंदे,संतोष मोरे,यावेळी विनोद खरात,संदीप सूर्यवंशी आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, नगरीतील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षणप्रेमी मंडळी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.दादाराव गुंडरे यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.विलास आडसूळ,श्री.प्रकाश गायकवाड, श्री.हनुमंत जाधव,श्री.वसंत मडके,श्री.अनिल पवार यांनी परिश्रम घेतले.