Views


*लोहारा तालुका कृषी पीक कर्ज वाटप समितीची आढावा बैठक आ.ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न*


लोहारा/प्रतिनिधी

लोहारा पं.स.च्या सभागृहात दि.27 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी तिन वाजता तालुका स्तरीय कृषी पीक कर्ज वाटप समितीची आढावा बैठक आ.ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी तहसीलदार संतोष रुईकर, सहाय्यक निबंधक अनिल काळे, यांच्यासह राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील शेतकरी हिप्परगा रवा येथील जिवन व्होनाळर, यांच्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांनी बॅंकेच्या पिक कर्ज वाटपाबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी मांडल्या. शेतकऱ्यांना व सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज वाटप करण्यास टाळाटाळ करु नये त्यांना तात्काळ कर्ज मंजुर करुन वाटप करण्यात यावे, अशा सुचना आ.ज्ञानराज चौगुले यांनी बॅंकेच्या अधिकाऱ्यांना यावेळी केल्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, अभिमान खराडे, उपतालुकाप्रमुख परवेज तांबोळी, सरपंच सागर पाटील, सरपंच नामदेव लोभे, सरपंच रमेश कांबळे, प्रताप लोभे, विनोद मुसांडे, सुरेश दंडगुले, अविनाश राठोड, बाबुराव पाटील, इंद्रजित लोमटे, रामेश्वर जाधव, बाळासाहेब कोरे, धर्मवीर जाधव,, शिवा सुतार, जालिंदर सितापुरे, यांच्यासह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

 
Top