Views


*येरमाळा पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध दारु निर्मीती अड्डा केला उद्ध्वस्त*


कळंब प्रतिनिधी


येरमाळा पोलीस गुरूवारी (दि.25) पहाटे गस्त घालत असताना खबऱ्या कडून मिळालेल्या माहितीनुसार पहाटे 1.00 वाजण्याच्या सुमारास वाडगाव (ज) येथे गावटी दारुचे अड्ड्यावर छापा मारत अड्डा उध्वस्त केले 

  कळंब तालुक्यातील वडगाव (ज.) येथे गावठी दारु निर्मीतीच्या अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी तेथे अनिता जितेंद्र पवार ही महीला गावठी दारु निर्मीती करताना आढलली. घटनास्थळी गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रणाचा एकुण 510 लिटर आंबवलेला द्रव हा लोखंडी- प्लास्टीक पिंपांत आढळला. तसेच 18 लि. गावठी दारु असा एकुण अंदाजे 30,800 ₹ किंमतीचा माल आढळला. यातील गावठी दारु निर्मीतीचा द्रव पदार्थ हा नाशवंत असल्याने पथकाने तो जागीच ओतून नष्ट करुन मद्य जप्त करून संबंधित महिलेवर महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65 (ई) (फ) अंतर्गत येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला 

           ही कारवाई उस्मानाबाद पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली येरमाळा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिनकर गोरे, पोलिस उपनिरीक्षक नाईकवाडे, सपोफौ मुंडे, सरक, पोहेकॉ मुंकूद गिरी, जवळगावकर, पठाण, पोना शिंदे, महिला पोलीस नाईक तस्लिम चोपदार यांच्या पथकाने केली आहे
 
Top