Views




*कळंब मध्ये दहीहंडी उत्साहात साजरी*



कळंब ( प्रतिनिधी)


दहीहंडी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. जन्माष्टमीचा सण श्रीकृष्णाच्या जन्माचे प्रतीक म्हणून साजरा करण्यात येतो. गेल्या दोन वर्षेपासून कोरोनाच्या संकटामुळे गोविंदाना दहीहंडी उत्सव साजरा करता आला नाही.मित्रसाधना क्रीडा मंडळाच्या वतीने 1990 पासून दहीहंडी चा कार्यक्रम घेतला जातो यंदा त्याचे 32 वे वर्ष होते ,यावर्षी देखील मोठ्या उत्साहात कळंब येथे मित्र साधना क्रिडा मंडळ ,लॉयन्स कंपनी आणि आझाद ग्रुप यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते.दहीहंडी फोडणाऱ्या संघासाठी 31,151 रु पारितोषिक ठेवण्यात आले होते.

      या दहीहंडीचे पूजन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, सिद्धेश्वर बँकेचे संचालक राजाभाऊ मुंडे, काँग्रेसचे सरचिटणीस भागवत धस, माजी पंचायत समिती सदस्य हरिभाऊ कुंभार ,लॉयन्स कंपनीचे संस्थापक अध्यक्ष कुणाल मस्के,आझाद ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष मोसीन मिर्झा,भैय्या बविकर ,संजीत मस्के, नागनाथ घुले यांच्या प्रमुख उपस्थितीत दहीहंडीचे पूजन करण्यात आले.
दहीहंडी फोडण्यासाठी पाच संघांनी सहभाग नोंदवला होता.विशेष म्हणजे आयोजकांनी सामजिक संदेश देत बक्षीसाची सर्व रक्कम अनाथ आश्रमास देण्याचा निर्धार त्यानी केला.
या कार्यक्रमासाठी मित्र साधना क्रिडा मंडळ ,लॉयन्स कंपनी आणि आझाद ग्रुप या ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतले आहे.या कार्यक्रमास अभूतपूर्व प्रतिसाद कळंबकराणांनी देऊन सर्व गोविंदा पथकाचा व सर्वाचा उत्साह वाढवला व तसेच नगरपालिका अधीकारी ,कर्मचारी व पोलीस प्रशाशनाचे आभार मानले, तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार मुस्तान मिर्झा यांनी केले.

 
Top