Views


*माकणी निम्न तेरणा प्रकल्पाचे 4 दरवाजे उघडले ;तेरणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू*



लोहारा/प्रतिनिधी


 तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पात काल मंगळवारी दि.30 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे पाण्याचा ओघ झपाट्याने वाढत असल्याने दि.31 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता 4 दरवाजे 0.10 मिटर उंचीने उघडण्यात असून तेरणा नदीपात्रात 43.328 घमी/सेकंदने (1530.11 घनफूट/सेकंद) विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदिकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हा प्रकल्प पुर्ण क्षमतेनी भरला असल्याने पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.

 
Top