Views


*२० हजाराची लाच स्वीकारणारा पोलीस नाईक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात*


उस्मानाबाद/ प्रतिनिधी


लोहारा पोलीस स्टेशन येथील पोलीस नाईक गोरोबा बाबासाहेब इंगळे , वय 35 वर्षे हे २० हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागा जाळ्यात सापडले आहेत. याबाबत माहिती अशी की,तक्रारदार यांचे विरुद्ध पो. स्टे. लोहारा येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांना अटक न करणे, लॉकअप मध्ये न टाकणे, चार्जशीट न पाठवणे व फायनल पाठवणे यासाठी यातील लोकसेवकाने तक्रारदार यांच्याकडे दिनांक 03.08.2022 रोजी 25000/- रुपये लाच रकमेची मागणी करून तडजोडी अंती 20,000/- रुपयांची मागणी करून दिनांक 04.08.2022रोजी 20,000/- रुपये लाच रक्कम पंचासमक्ष जेवळी रोडवर एच पी पेट्रोल पंपाजवळ घेताना उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले 
यासंबंधाने पो स्टे लोहारा येथे गुन्हा नोंद करण्यात आला

     सदर कार्यवाही ही मा. डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद.मा.विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. औरंगाबाद. यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत संपते , पोलीस उप अधीक्षक,ला.प्र. वि. उस्मानाबाद पोलीस अंमलदार इफ्तेकार शेख, दिनकर उगलमूगले ,विष्णू बेळे , जाकेर काझी यांनी केली.


   

*उस्मानाबाद जिल्ह्यातील कोणी लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा*

प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र. वि. उस्मानाबाद
मो.नं. 9527943100
श्री अशोक हुलगे,पोलीस निरीक्षक,
ला.प्र. वि. उस्मानाबाद
मो.नं.8652433397
विकास राठोड,पोलीस निरीक्षक,
ला.प्र. वि. उस्मानाबाद
मो.नं. 7719058567
कार्यालय 02472 222879
 
Top