Views


*मोहेकर महाविद्यालयामध्ये एस.आर.रंगनाथन जयंती साजरी*

कळंब/प्रतिनिधी 


  ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस.आर.रंगनाथन यांचा जन्मदिवस आहे. तोच दिवस हा ग्रंथपाल दिन व ग्रंथालय दिन म्हणून सबंध भारतभर साजरा केला जातो.ग्रंथालयशास्त्रसाठी त्यांचे खूप मोठे योगदान आहे. हेच औचित्य साधून मोहेकर महाविद्यालयामध्ये डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून व त्यांनी केलेल्या कार्याबद्दल माहिती जाणून घेऊन मोठ्या उत्साहामध्ये जयंती साजरी करण्यात आली.यावेळी ज्ञानप्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील पवार, डॉ.दादाराव गुंडरे, सहाय्यक ग्रंथपाल श्री अरविंद शिंदे, प्रा.सुशील जमाले,डॉ. नामानंद साठे,डॉ.मीनाक्षी जाधव,प्रा.राजीव कारकर, प्रा.बालाजी राऊत, प्रा.नागनाथ आदाटे, प्रा.राहुल भिसे, श्री. अंकुश लोकरे,श्री.गणेश पाटील, श्री.बंडू शेळके,श्रीमती संगीता रुमने, श्रीमती आर.जी भारती सर्व ग्रंथालयातील कर्मचारी उपस्थित होते.

 
Top