Views
*रासेयो ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयास सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार*


कळंब/प्रतिनिधी 


राष्ट्रीय सेवा योजना विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद च्या वतीने रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रशंसा पुरस्कार (२०१७-१८) प्रा. डॉ.दीपक सूर्यवंशी प्रदान करण्यात आला आहे. तसेच (२०१९-२०२०) सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार- शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयास प्रदान करण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट रासेयो कार्यक्रमाधिकारी पुरस्कार- प्रा. ईश्वर राठोड, सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार अनिकेत बोर्डे या विद्यार्थ्याला प्रदान करण्यात आला. सदर पुरस्काराचे वितरण २६ जुलै रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. डॉ. प्रमोद येवले, रासेयो राज्य समन्वयक प्रमोद वणजे, माजी संचालक टी.आर. पाटील, रासेयो संचालक डॉ.आनंद देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. अत्यंत मानाचे प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार मिळाला त्याबद्दल ज्ञानप्रसारक मंडळ संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर, प्राचार्य डॉ. सुनील पवार यांनी अभिनंदन केले आहे. तसेच उपप्राचार्य डॉ. हेमंत भगवान, प्रा. डॉ.के डी जाधव, प्रा. डॉ. दादाराव गुंडरे, प्रा. डॉ. डी एस जाधव, प्रा.डॉ.एल.एम.थोरात, प्रा. डॉ. के डब्ल्यू. पावडे ,प्रा. डॉ. आर व्ही ताटीपामुल, प्रा. एन जी साठे, डॉ. संदीप महाजन, प्रो.डी.एन. चिंते, प्रा.डॉ.जयवंत ढोले, ग्रंथपाल प्रा अनिल फाटक, सहायक ग्रंथपाल श्री अरविंद शिंदे, श्री संतोष मोरे, श्री हनुमंत जाधव तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनीही अभिनंदन केले आहे.

 
Top