Views


*शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी - उमेश मडके*

कळंब/प्रतिनिधी


गोगलगाय व सोयाबीनच्या खराब बियाण्यामुळे कळंब तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे शासनाने तात्काळ आर्थिक मदत करावी या मागणीचे निवेदन प्रभारी तहसीलदार मुस्तफा खोंदे यांना दिनांक २९ जुलै २०२२ रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे तालुका कार्याध्यक्ष उमेश मडके यांनी दिले आहे.
 दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कळंब तालुक्यातील अनेक गावात मोहा,दहिफळ,वाघोली, बारातेवाडी,संजीतपुर आणि इतरही गावात गोगलगायचा सोयाबीन पिकावर प्रादुर्भाव झाल्यामुळे व खराब बियाण्यामुळे एका एका शेतकऱ्यांना तीन ते पाच एकर दुबार पेरणी करावी लागली. गोगलगायने उगवलेले सोयाबीन अनेक प्लॉटवरील १००% खाल्ल्यामुळे त्या शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. पावसाच्या सतत पडल्यामुळे सोयाबीन पिके पिवळे पडू लागली आहे त्याचा परिणाम सोयाबीन पिकाच्या उत्पादनावर होणार आहे.
 त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाली आहे.म्हणून शासनाने तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर युवकचे तालुका कार्याध्यक्ष उमेश मडके,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका कार्याध्यक्ष सुरेश टेकाळे,शहराध्यक्ष मुसद्देक काझी,अल्पसंख्याक विभाग तालुकाध्यक्ष सलमा सौदागर, तालुका प्रसिद्धीप्रमुख अविनाश घोडके,राष्ट्रवादी सामाजिक न्याय तालुका कार्याध्यक्ष राहुल कसबे,सर्जेराव सावंत आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

* शासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेवून गावाचे ग्रामसेवक, कृषी सहाय्यकांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

  - मुस्तफा खोंदे
प्रभारी तहसीलदार,कळंब

 
Top