Views




*पूज्य ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या जयंतीनिमित्त ज्ञानदिंडीचे आयोजन*



कळंब/प्रतिनिधी 

 महाराष्ट्रात बहुजन समाज शिक्षणाच्या परिप्रेक्षात आणण्यासाठी राजर्षी शाहू महाराज डॉ.पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील, कर्मवीर मामासाहेब जगदाळे, डॉ.बापूजी साळुंखे तसेच शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी अविरत प्रयत्न केले आहेत. याची जाणीव ठेवून गुरुजींच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याची माहिती व्हावी, यासाठी प्रतिवर्षी प्रमाणे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींची ९५ वी जयंतीनिमित्ताने शहरातून भव्य ज्ञानदिंडीचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी कलावंतांनी आपल्या कलेचे सादरीकरण, विविध घोषवाक्याचे नारे दिले, महाविद्यालयातील मोहेकर गुरुजींच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आली.


 पोलीस उपअधीक्षक एम.रमेश, गुरुजींच्या अर्धांगिनी श्रीमती सुमनताई मोहेकर, संस्थेचे अध्यक्ष श्री आबासाहेब बारकुल, सचिव डॉ. अशोकराव मोहेकर आणि मोहेकर कुटुंबिय, प्राचार्य. डॉ. सुनील पवार, संचालक डॉ.डी.एस.जाधव, प्रा. संजय मिटकरी, आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर देवी रोड, एसबीआय बँक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे विद्याभवन प्रांगणात असलेल्या समाधीस्थळ पर्यंत काढण्यात आली. 

     यावेळी उपप्राचार्य डॉ. हेमंत भगवान,डॉ. सतीश लोमटे, डॉ. ए बी बोंदर, प्रा. डॉ. के डब्ल्यू. पावडे ,श्रीमती वायभासे, प्रा .प्रा. डॉ.के डी जाधव, प्रा. डॉ. दादाराव गुंडरे, प्रा. डॉ. डी एस सूर्यवंशी, प्रा.डॉ.एल.एम.थोरात, ,प्रा. डॉ. आर व्ही ताटीपामुल, प्रा. एन जी साठे, डॉ. संदीप महाजन, प्रो.डी.एन. चिंते, प्रा.डॉ.जयवंत ढोले, ग्रंथपाल प्रा अनिल फाटक, सहायक ग्रंथपाल श्री अरविंद शिंदे, श्री संतोष मोरे, श्री हनुमंत जाधव तसेच शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व संस्थेचे शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर ज्ञानदिंडीसाठी पोलीस प्रशासनाचे मोलाचे सहकार्य लाभले.

 
Top