Views


*लिटल जिनिअस प्रीस्कूल मधील नरसरी मधील श्रीशा स्वरूप मांडवकर हिने विठ्ठ्लाची केले वेशभूषा.*

कळंब/प्रतिनिधी 


     येथील लिटल जिनिअस प्रीस्कूल मधील नरसरी मध्ये साडेतीन वर्षाची कु.श्रीशा स्वरूप मांडवकर हिने विठ्ठलाची वेशभूषा करून सर्वांची मने जिंकली.
यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
     आषाढी वारी आली की प्रत्येक शाळेत विठ्ठल रुक्मिणी च्या वेशभूषा करण्यासाठी लहान मुले आतुर असतात.वारकऱ्यांची वेषभूषा घेऊन शहरात दिंडी सुद्धा काढली जाते. याच निमित्ताने लिटल जिनिअस प्रीस्कूल मधील नरसरी मधील बाळ गोपळानी वेशभूषा केली होती. दोन वर्षाच्या खंडानंतर बालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. वर्षांनी शाळा सुरू झाल्याने विध्यार्थी सुद्धा आनंदाने सहभागी होत आहेत.
 
Top