Views
*आषाढी एकादशीला आपल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना फराळाची सोय भाजपाच्या वतीने*


कळंब (प्रतिनिधी) 


आषाढी एकादशीला आपल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना फराळाची सोय भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे. साधारण सात हजाराच्या आसपास वारकऱ्यांना फळाचे वाटप करण्यात आले आहे. 

क्षुधेलिया अन्न ! दयावे पाञ न विचारून !!
धर्म आहे वर्मा अंगी ! कळले पाहीजे प्रसंगी !!
या अभंगात तुकोबारायांनी अन्नदानाचे महत्व सांगीतले आहे, यातच खरा धर्म आहे. भुकेल्याला अन्नदान म्हणजेच खरया धर्माचे वर्म होय. हे वेळप्रसंगी माणसाला कळले पाहीजे. म्हणजेच तुकोबाराय भुकेल्या व्यक्तीला पोटभर जेऊ घालणे हाच धर्म असल्याचे सांगतात.
आषाढी एकादशीला आपल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी अनेक वारकरी पावन नगरी पंढरपूर च्या दिशेने वाटचाल करुन असून त्यामुळे भक्तीचा मळा फुलला आहे. कळंब शहरातुन पंढरपूर कडे जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे शहरासह कळंब येरमाळा रोड वरती अनेक अन्नदाते अन्नदान करतात. आषाढी एकादशी दिवशी बस व इतर वाहनाने पंढरपूर कडे जाणाऱ्या वारकऱ्यांना खिडची सोय व्हावी या करीता भाजपा च्या वतीने शहरातील बस स्थानकावर सकाळी पासुन खिचडी व केळी ची सोय करण्यात आली होती. यावेळी साधारण तीन क्विंटल साबुदाण्याची खिचडी आचारी शिवाजी सिरसट यांनी बनवुन दिली. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांनी वारकऱ्या करीता अन्नदानाची सोय केली होती. यावेळी 
तालुका सरचिटणीस माणिक बोंदर,युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रशांत लोमटे, डिकसळ चे सरपंच अमजद मुल्ला,युवा मोर्चा शहराध्यक्ष रोहित कोमटवार, सतपाल बनसोडे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष विकास कदम, सुजित लिमकर,अभय गायकवाड, रणजीत चंदनशिवे, इम्रान मुल्ला, विशाल ठोंबरे,शिवाजी शेंडगे, बाबुराव शेंडगे,अमर चाऊस, अशोक क्षीरसागर, इमरान काजी,ज्योतिबा नवले,शिवा शिंगणापूर, तानाजी चव्हाण,मोहसीन मिर्झा, बंटी चोंदे,बापु माने, विकास लोमटे, धनंजय आडसुळ यांनी परिश्रम घेतले.

 
Top