Views


*मोटारसायकल चोरी तसेच ट्रॅव्हल्सवरील बॅग चोरणारे दोघे अटकेत.*


कळंब/प्रतिनिधी 

 बेंगलोर येथील प्रविणकुमार तुळशीराम जबडे यांनी दि. 13 जून रोजी 03.45 वा. सु. येरमाळा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वरील भारत पेट्रोलियम किरकोळ विक्री केंद्राजवळ आपला टेम्पो ट्रॅव्हल्स थांबवलेला होता. दरम्यान एका मोटारसायकलवर आलेल्या तीन अनोळखी पुरुषांनी त्या ट्रॅव्हल्सवरील 2,16,000 ₹ किंमतीचे सुवर्ण दागिने असलेल्या तीन पिशव्या चोरुन नेल्या होत्या. यावर जबडे यांनी येरमाळा पो.ठा. येथे गुन्हा क्र. 139/2022 हा भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत दि. 16 जून रोजी नोंदवला आहे.

            तपासादरम्यान येरमाळा पो.ठा. च्या पथकाने गुन्ह्याच्या कार्यपध्दतीचा अभ्यास व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा, ता. वाशी येथील 1) प्रशांत बापु पवार उर्फ सचिन 2) दत्ता दादा काळे या दोघांना आज दि. 11 जुलै रोजी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुशंगाने कसुन व कौशल्यपुर्ण चौकशी केली असता त्यांनी चोरीनंतर त्या बॅग व कपडे जाळल्याचे सांगीतले. तसेच हा गुन्हा करताना वापरलेल्या मोटारसायकलसह अन्य एक पल्सर मोटारसायकल पोलीसांनी त्यांच्याकडून जप्त केली. त्या पल्सर मोटारसायकलच्या सांगाडा- इंजीन क्रमांका आधारे माहिती घेतली असता ती चोरीस गेल्याने येरमाळा पो.ठा. येथे 153/2021 हा भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत नोंदल्याचे समजले. अशा प्रकारे एका गुन्ह्यासह दुसरा गुन्हा सुध्दा उघडकीस आणण्यात आला असुन गुन्ह्यातील तीसऱ्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.

            सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक- श्री. एम. रमेश यांच्या सुचनांप्रमाणे येरमाळा पो.ठा. चे सपोनि- श्री. दिनकर गोरे, पोउपनि- श्री. नितीन पाटील, पोहेकॉ- प्रशांत जवळगावकर, पोना- किरण शिंदे, संतोष तिघाडे, पोकॉ- गणेश गुळमे यांच्या पथकाने केली आहे.
 
Top