Views








*येडेश्वरी मंदिर डोंगर परिसरात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त वृक्ष लागवड*

कळंब/ प्रतिनिधी


तालुक्यातील येरमाळा येथील येडेश्वरी मंदिर परिसराच्या डोंगर भागांमधये उस्मानाबाद जिल्हा पोलीस दल उपविभाग कळंब आयोजित भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त निमित्त वृक्ष लागवड करण्यात आली.

     येरमाळा येथील श्री क्षेत्र येडेश्वरी मंदिर परिसराच्या डोंगर माथयावर उस्मानाबाद जिल्हा पोलिस दल उपविभाग कळंब यांच्यावतीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त वृक्ष लागवड श्रमदानासाठी पोलिस कर्मचारी विद्यार्थी व तसेच व्यापारी वर्गातून सहकार्य लाभले. जवळपास सतराशे रोपांची लागवड यावेळी करण्यात आले. यामध्ये वड, पिंपळ, चिंच, आवळा, बेल, आंबा, आपट्याची झाडे, अशा विविध वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली. 


या वृक्ष लागवड उपक्रमाच्या श्रमदाना वेळी उस्मानाबाद चे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सहाय्य्क पोलीस अधीक्षक उपविभाग कळंब एम रमेश साहेब, बि. डी. ओ. रावसाहेब चकोर, येरमाळा पोलिस स्टेशनचे सपोनि दिनकर गोरे, मंडल धिकारी कांबळे, ग्रामसेवक अशोक आमले, येरमाळा ग्रामपंचायतचे उपसरपंच गणेश बाबा बारकुल, येडेश्वरी देवस्थान ट्रस्टचे समाधान बेद्रे, संजय आगलावे तसेच येरमाळा परिसरातील पोलीस पाटील, पत्रकार बांधव, व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तसेच यावेळी येरमाळा परिसरात असणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्वक सहभाग होता.

 
Top