Views
*ओबीसी आरक्षणाचा सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे फटाके फोडून स्वागत*


कळंब /प्रतिनिधी 

      महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या बांठिया आयोगाने इम्पेरिकल डेटा व ट्रीपल टेस्टची पूर्तता केल्याने ओबीसी आरक्षणानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय अत्यंत महत्वाचा असून ओबीसी समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळालेले आहे. 

       महाविकास आघाडी सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा हक्क अबाधित रहावा यासाठी पायाभरणी केली होती त्याला यश आले आहे. त्यानिमित्ताने दि.२० जुलै २०२२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस कळंबच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून व घोषणा देवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे मराठवाडा अध्यक्ष डॉ.संजय कांबळे,माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा,सागर मुंडे,शहराध्यक्ष मुसद्देक काझी,अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष महंमद चाऊस,पंचायत समिती माजी सदस्य रामहारी मुंडे, तालुका कार्याध्यक्ष सुरेश टेकाळे,सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष किरण मस्के,तालुका प्रसिद्धी प्रमुख अविनाश घोडके,माजी नगरसेवक अमर गायकवाड,माजी नगरसेवक बाबू बागरेचा,शहर कार्याध्यक्ष महेश पूरी,शकील काझी,अतिश वाघमारे,प्रल्हाद पडेकर,राजू भोसले आदींची उपस्थिती होती.

 
Top