Views


*उस्मानाबाद बसस्थानकातुन महिला प्रवाशाचे ७२ हजार लंपास*

उस्मानाबाद/प्रतिनिधी 


जिल्ह्यातील बसस्थानकात प्रवाशांचे पैसे मोठ्या प्रमाणात चोरीला जात आहेत. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात दररोज गुन्हे दाखल होत आहेत. अशीच घटना उस्मानाबाद बसस्थानकात १५ जुलै रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली आहे. बेंबळी येथील महिला प्रवाशाची ७२ हजार रुपये रोख रक्कम असलेली पर्स चोरट्यांनी लंपास केली आहे

महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात आनंदनगर पोलीस ठाण्यात १८ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेंबळी येथील शोभा विलास सोनटक्के ह्या १५ जुलै रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास उस्मानाबाद बसस्थानकात होत्या. त्या लोहारा बसमध्ये चढत असताना चोरट्याने त्यांची ७२ हजार रुपये रोख रक्कम असलेली पर्स लंपास केली. या प्रकरणी शोभा सोनटक्के यांनी १८ जुलै रोजी दिलेल्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
Top