*जुगार अड्ड्यावर छापा 22,67,120/- रुपयांच्या मुद्देमाल सह चौदा जणांना घेतले ताब्यात*
कळंब/प्रतिनिधी
तालुक्यातील डिकसळ येथील ढोकी रस्त्यालगतच्या एका शेडमध्ये तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती सहा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांना बुधवार दिनांक 6 जुलै रोजी मिळताच रात्री 08:30 च्या सुमारास पथकासह त्यांनी छापा टाकला असता
कळंब येथील सम्राट गायकवाड, हुजेब बागवान, रियाज अत्तार, मनसुर बागवान, रहुदास हगारे, रोहन कांबळे, गंगाराम पवार, राहील शेख, सत्तार शेख, उमरान मिर्झा, शरद ढीवार, अमोल राउत, संजित मस्के, ओमकार कसबे हे सर्व तिरट जुगार खेळत असतांना जुगार साहित्यासह 8 भ्रमणध्वनी, 4 मोटारसायकल, 4 चारचाकी वाहने व रोख रक्कम असा एकुण 22,67,120 ₹ चा माल बाळगलेले पथकास आढळले.त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करून कळंब पोलीस स्टेशन येथे अटक करण्यात आली.
सदर कार्यवाही उस्मानाबाद पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलिस अधीक्षक नवनीत काॅंवत यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी एम रमेश यांनी आपल्या पथक पोलिस उपनिरीक्षक जी.पी.पुजरवाड ,सपोफौ कराळे,पोना सादीक शेख, किरण अंभोरे, अनिल मंदे, चव्हाण केली.
कळंब उपविभागीय अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक एम रमेश हे अवैद्य धंदा करणाराचे कर्दनकाळ ठरत असल्याने अवैध धंदे करणाराचे धाबेदनानले आहेत. कुणकुण लागतात धडक कारवाई करत असल्यामुळे.