*दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर कळंब याठिकाणी ८ वा आंतरराष्ट्रीय याेग दिन साजरा*
कळंब/प्रतिनिधी
येथील दिवाणी न्यायालय क. स्तर कळंब याठिकाणी तालुका विधी सेवा समिती व विधीज्ञ मंडळ कळंब यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक २१ जून रोजी ८ वा अांतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. मा. उच्च न्यायालय यांचे आदेशाप्रमाणे तसेच मा. जिल्हा न्यायालय उस्मानाबाद आणि मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी निर्देशित केल्याप्रमाणे त्यांचे मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबीराचे आयोजन देखील करण्यात आले होते. सदरील योग शिबीरामध्ये अॅड. श्री. एस. एम. कुलकर्णी जेष्ठ विधीज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित अधिकारी, कर्मचारी व विधीज्ञ यांनी विविध प्रकारच्या योगासनाचे प्रात्यक्षिक केले. योग शिबीराला सुरूवात करण्यापूर्वी मा. उच्च न्यायालय यांचेकडून प्राप्त सूचनांप्रमाणे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने मा. प्रधानमंत्री महोदय यांनी देशाला केलेल्या संबोधनाचे थेट प्रक्षेपण पाहण्यात आले.
सदरील शिबीरासाठी श्री. आर. पी. बाठे, दिवाणी न्यायाधीश तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती कळंब, श्रीमती ए. सी. जोशी मॅडम, सहदिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब, श्री. एम. ए. शेख दुसरे सहदिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब, विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. मंदार मुळीक, जेष्ठ विधीज्ञ अॅड. एस. एम. कुलकर्णी, अॅड. टी. बी. मनगिरे, अॅड. एम. डी. पंडीत, अॅड. पी. एस. कुलकर्णी, अॅड. बी. ए. जाधवर, अॅड. एस. वाय. काळे, अॅड. डी. एन. गोंड, अॅड. सी. बी. बिक्कड, अॅड. बी. एस. लोमटे, अॅड. बी. बी. साठे, अॅड. श्रीमती एस. आर. फाटक, अॅड. एस. एम. ढेपे. अॅड. ए. एन. ढेपे, अॅड. एस. एम. जाधवर तसेच न्यायालयीन कर्मचारी हे उपस्थित होते. सदरील शिबीराच्या शेवटी श्री. आर. पी. बाठे, दिवाणी न्यायाधीश तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती कळंब यांनी उपस्थितांचे आभार मानले व सामुहिक राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.