*रिपब्लिकन सेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालय कळंब समोर धरणे आंदोलन*
उस्मानाबाद /प्रतिनिधी
जिल्ह्य़ातील गायरान जमीनीवर केलेले अतिक्रमण कायम करण्यात यावे या मागणीसाठी आज कळंब उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आले उस्मानाबाद जिल्ह्य़ातील पडीक गायरान जमीनीवर गेल्या 15-20 वर्षापासून कायम अतिक्रमित जागेवर वास्तव्यात आहेत परंतु तलाठी ग्रामसेवक यांनी अध्यापक पर्यंत अतिक्रमण करणार्या भूमीहीन कुटूंबाला मालकी हक्क प्रदान केलेला नाही त्यामुळे सदरील कुटुंबासाठी घरकुल योजना असेल किंवा अन्य इतर कोणत्याही शासकीय योजना घेता येत नाहीत त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत गावागावात काही राजकीय विरोधामधून कुणाचे नाव आठ - अ ला नाव लावत आहेत व काही लोकांचे नाव लावत नाहीत त्यामुळे अशा मधून गावात जाती जाती मध्ये भांडण होत आहेत सामाजिक शांतता भंग पावत आहे त्यामुळे प्रशासनाला त्याचा त्रास होत आहे ज्या लोकांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे परंतु जागा नावावर नाही अशा लोकांसाठी महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक :प्रआयो - 2017/प्र क्र 348/ योजना 10 निर्णया नुसार सर्वांसाठी घरे या धोरणाशी प्रभावी अमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागातील शासकीय जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे नियमाकूल करण्याचा शासन निर्णय वरिल प्रमाणे झालेला आहे या शासन निर्णयानुसार अतिक्रमित लोकांना त्यांच्या नावावर जागा करण्यात यावी व जे लोक १५-२० वर्षे पासून अतिक्रमण करून राहत आहेत त्या लोकांना देखील जागा उपलब्ध करून देण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे आंदोलन स्थळी भेट देऊन पसचे विस्तार अधिकारी जाधव टि जे यांनी मा उपविभागीय अधिकारी यांच्या समोर ग्रामसेवक यांना पत्र काढून शासन निर्णय दि १६ फेब्रुवारी २०१८ या नुसार ज्या लोकांना घरकुल मंजूर आहे अशा लोकांना जागा उपलब्ध करून देण्यात येईल व जे लोक १५-२० वर्षे पासून अतिक्रमण करून शासकीय जमिनी वर रहातात अशा लोकांना ८अ उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले रिपब्लिकन सेना उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष अनिल हजारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले यावेळी उपस्थित विठ्ठल मामा समुद्रे सूरज वाघमारे विशाल वाघमारे किशोर वाघमारे राहुल गाडे आदमाने शरद सायस हजारे सुरेश तांबारे सचिन वाघमारे भारत जाधव अविनाश वाघमारे ज्ञानेश्वर गायकवाड व ईतर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते