Views






*माय बापाहुन भीमाच हो......
माय बापाहुन भीमाच,
उपकार लय हाय र हो.......
तुम्ही खाता त्या भाकरीवर,
बाबासाहेबांची सही हाय र 
या गिताने बहारदार मनोरंजक आणि प्रबोधनपर गीतांनी प्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.*


कळंब (प्रतिनिधी) 


माय बापाहुन भीमाच हो......
माय बापाहुन भीमाच,
उपकार लय हाय र हो.......
तुम्ही खाता त्या भाकरीवर,
बाबासाहेबांची सही हाय र 
यासह अनेक बहारदार मनोरंजक आणि प्रबोधनपर गीतांनी प्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. 

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी कळंब च्या वतीने प्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांच्या कार्यक्रमाचे आयोजन नगर पालिका शाळेच्या मैदानावर करण्यात आले होते. 
  प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राणाजगजितसिंह पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन रामहरी शिंदे, संचालक अरुण चौधरी, प्रणव चव्हाण, पंचायत समिती माजी सभापती दत्तात्रय साळुंके, भाजपा चे सतपाल बनसोडे, रिपाइं (ए) तालुकाध्यक्ष किशोर वाघमारे, रिपाइंचे मराठवाडा अध्यक्ष बंडुभाऊ हौसलमल, रिपाइंचे तालुकाध्यक्ष शिवाजी सिरसट आदींची उपस्थिती होती. आंबेडकरी चळवळ योगदान देणाऱ्या जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. 
  कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध गायिका कडुबाई खरात यांनी "मी माझ्या कातड्यांचा जोडा जरी शिवून दिले तरी बाबासाहेबांचे उपकार माझ्यानं फिटणार नाही, एवढं बाबासाहेबांनी मला दिलं आहे. मी बाबासाहेबांचे गाणे म्हणते. बाबासाहेब होते म्हणून मी आतापर्यंत वाचले. त्यांच्या जीवावर मी आज माझे लेकरं पोसते आणि मी सुद्धा पोटाला पोटभर खाते," असं त्या आवर्जून सांगितले, 
समाज माध्यमांवर गाजलेल्या ‘माझ्या भीमानं सोन्यानं भरली ओटी..’ 
या गाजलेल्या गीतांसह विविध भीमगीते व प्रबोधनपर गाणी आपल्या लयबद्ध सुरात सादर केली. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात गाण्यांना प्रतिसाद दिला. यावेळी मोठय़ा संख्येने आनुयायी उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अभिजीत गायकवाड यांनी तर आभारप्रदर्शन तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहराध्यक्ष संदीप बावीकर, माणिक बोंदर, मिनाज शेख, शिवाजी गिड्डे, युवा मोर्चाचे रोशन कोमटवार संतोष कसपटे, इम्रान मुल्ला आदींनी परिश्रम घेतले. 
चौकट 
कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांना भरपूर गर्दी केली होती. यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने दोन क्लिंटल राईस बनवून वाटप करण्यात आला. या करीता इम्रान मुल्ला, इमरान काजी, अभय गायकवाड, अलीम दारुवाले, रणजीत चंदनशिवे, सम्राट गायकवाड, दिपक गायकवाड, इम्रान खान, शौकत शेख, तानाजी चव्हाण, शफिक शेख, करण गायके, सलीम बागवान, फर्मान सय्यद, समीर सय्यद, राहुल मुळे, अक्षय सातव आदिंनी परिश्रम घेतले.


 
Top