Views


*केज मध्ये शुक्रवारी श्रींचा पादुका पुजन व  प्रवचन दर्शन सोहळा!*

 कळंब/प्रतिनिधी 

अंनत श्री विभूषीत जगद़गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज  दक्षिण पीठ नानिजधाम यांचे सिघ्द पादुका पुजन व दर्शन प्रवचन  सोहळया चे आयोजन शुक्रवार दि, २९ एप्रिल रोजी  सकाळी १० वाजता उद्धव स्वामी इनाम मैदान केज ,आंबेजोगाई रोड जिल्हा बीड  येथे जवळ च्या प्रांगणात  आयोजन  करन्यात आले आहे ,याच दिवशी सकाळी भकत दिक्षा चा ही कार्यक्रम होणार आहे . या   संस्थानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यात गरीब व गरजू व्यक्तींना परमपूज्य जगतगुरू नरेंद्राचार्यजी महाराज नानीज धाम या संस्थानच्या वातिने  गरीब महीलांना शिलाई मशीन ,जनावरांना चारा, शौशिण साधने चे मोफत वाटप केले जाते .
या कार्यक्रमाला पन्नास हजारावर भक्तगण उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हा निरीक्षक अमोल कुलकर्णी
जिल्हा अध्यक्ष सौ पदमीन ताई तांदळे यांनी  दिली आहे .
याच बरोबर मार्गदर्शन व प्रवचन  दर्शन सोहळयासाठी येणाऱ्या भगक्तगंनासाठी दि. २८ पासून सर्व भाविकांना  मोफत महाप्रसाद वअन्नदान होणार आहे.तरी उस्मानाबाद जिल्हयातील भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन उस्मानाबाद जिल्हा सेवा समितीचे अध्यक्ष संतोष केसकर ,उस्मानाबाद जिल्हा युवा अध्यक्ष रामजी सगर ,उस्मानाबाद जिल्हा महिलाध्यक्ष राधाताई गिरी जिल्हा सेवा समितीचे प्रासिध्दी प्रमुख विलास मुळीक यांनी केले.
 
Top