Views


*खूनासह दरोड्यातील दोन फरार आरोपी पोलिसांनी केले जेरबंद*


कळंब/ प्रतिनिधी


शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती मधील दुकानांमध्ये टाकलेल्या खुनासह दरोड्यातील दोन आरोपींना स्थानिक पोलीस पथकाने बुधवारी (दि.२०) रोजी अटक केली. 

पोलिसा कडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती मधील रोहन ट्रेडिंग कंपनी या आडत दुकाना मध्ये नऊ दहा महिन्यांपूर्वी वॅचमन चा खून करून दरोडा टाकण्यात आला होता. दरोडेखोरांनी गावठी पिस्तूल मधून गोळी झाडून वॅचमन चा खून केला. या दरोड्यात ११ आरोपी विरुद्ध कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले होते. या पैकी ५ आरोपींना या पूर्वी अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडी मध्ये आहेत.सहा आरोपी फरार आहेत. दरोड्यातील फरार आरोपी पैकी दोन आरोपी सकाळी सात वाजे अहिल्याबाई होळकर चौकात इडली च्या हाॅटेल मध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

पोलिस उपविभागीय अधिकारी एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जाधव सहायक पोलिस निरीक्षक अतुल पाटील, पोलिस नाईक फरहान पठाण, शिवाजी राऊत, प्रशांत राऊत ,पोपट जाधव यांनी बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून सापळा रचून फरार आरोपी शंभर मच्छिंद्र काळे रा.कल्पना नगर कळंब यास इडली च्या हाॅटेल मध्ये छापा टाकून ताब्यात घेतले.या प्रकरणातील दुसरा फरार आरोपी शाम ऊर्फ बजा रामा पवार हा बाजार मैदानातील भागात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून या आरोपीस पोलिसांनी अटक केली.


 
 
Top