Views


*कळंब येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या संकल्पनेतून कार्यशाळा*


कळंब/प्रतिनिधी


ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवक युवतींना योग्य प्रकारे मार्गदर्शन व्हावे या उदात्त हेतूने कळंब येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या संकल्पनेतून कार्यशाळा घेण्याचा निर्धार नुकताच पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.

कळंब येथील पोलिस स्टेशन येथे शनिवार ता.२३ रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. आगामी काळात कोणत्याही हुद्यावर पोहचण्यासाठी स्पर्धात्मक परिक्षेला सामोरे जावे लागणार आहे. याची ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकऱ्यांच्या विद्यार्थ्यांना तोंडओळख व्हावी याकरिता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नुकत्याच कांहीं दिवसांपूर्वी तालुक्यातील ईटकुर येथे आयोजित केलेली रुरल टॅलेंट सर्च बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी एम.रमेश यांनी बारकाईने निरीक्षण केले असता त्यांना जाणीव झाली की, ह्या भागातील युवक युवती स्पर्धा परीक्षेची तयारी करतात परंतु त्यांना योग्य असे मार्गदर्शन मिळत नाही. हीच खंत मनात ठेऊन त्यांनी पत्रकारांशी सुसंवाद साधून ग्रामीण भागातील अशा युवक युवतींना एकत्रित पाचारण करून सात दिवसाचे निवासी शिबिर घेण्याचे ठरवले आहे. 

 सदरील आयोजित केलेल्या ह्या सात दिवसाच्या शिबिराची सुरुवात येत्या कामगार दिनी म्हणजेच १ मे रोजी शहरातील मोहेकर महाविद्यालयाच्या डिकसळ येथील मैदानावर घेण्याचे आयोजन करण्यात येत आहे. कळंब उपविभागीय कार्यालयात हद्दीत येणाऱ्या सर्व ग्रामीण भागातील युवक युवती जे की नित्यानियमने सराव करतात यांची निवड भागातील स्थानिक पोलीस पाटील, सरपंच यांच्या निगरणीखालून युवक युवतींची करण्यात येणार आहे. यामधे प्रामुख्याने कळंब, शिरढोण, ढोकी, येरमाळा, वाशी , मोहा, दहिफळ, चोरखली, तेरखेडा व आजूबाजूचे खेडी आदी परिसरातून निवडी होणार आहेत. सदरील शिबिर हे सात दिवस राबवले जाणार असून यामध्ये युवक व युवतींना स्वतंत्र राहण्याची व्यवस्था करणार असून यामध्ये सकाळी व सायंकाळी असे दोन वेळेला मैदानी प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

तर दुपारच्या सत्रात जिल्हाभरातून अनुभवी अशा यशस्वी अशा अधिकारी, ज्येष्ठ नागरिक यांचे प्रबोधनात्मक पाठांचे पण नियोजन केले जाणार आहे. जेणेकरून कार्यशाळेतील युवकांना चालना मिळून ते सुद्धा यशस्वी होतील. स्वतः सहाय्यक पोलीस अधीक्षक एम रमेश हे या कार्यशाळेत कामकाजाच्या वेळे व्यतिरिक्त उपस्थित राहणार आहेत. मुळात त्यांना एक आवड अशी आहे की विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून प्रत्येक विद्यार्थी हा एक चांगला आदर्श नागरिक व्हावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

या करिअर मार्गदर्शन आणि युवा विकास कार्यशाळेला सहाय्यक पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी "रुरल टॅलेंट हंट" असे नाव दिले आहे. हे शिबिर महाराष्ट्र दिनी १ मे ते ७ मे दरम्यान असणार आहे तर समारोप दिवशी सार्वजनिक कळंब वासियांकरिता अशी एक मॅरेथॉन घेण्यात येणार असून मॅरेथॉन मधे लहानापासून ते मोठ्या वयोगटातील स्त्री पुरुष मुले मुलींसाठी खुली राहणार आहे. 
यावेळी पोलीस निरीक्षक यशवंत जाधव सह पत्रकार उपस्थित होते.
--------------------------------------------------------------



चौकट : सहाय्यक पोलीस अधीक्षक एम रमेश हे कार्यालयीन कामकाज यातून वेळ मिळाला तर ते बहुतांशी वेळा मैदानावर तासंतास धावणे, व्यायाम करणे, योगासने करणे हे ते पसंत करतात. ते म्हणतात आरोग्य हीच खरी संपत्ती आहे .
 
Top