*उस्मानाबादच्या पोलिस अधीक्षक पदी अक्षय शिंदे*
*नीवा जैन यांची पदोन्नतीने पदस्थापना अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग, नागपूर शहर येथे बदली*
उस्मानाबाद/प्रतिनिधी
उस्मानाबाद जिल्हा पोलिस अधीक्षक नीवा जैन यांची पदोन्नतीने बदली झाली असून त्यांच्या जागी अक्षय शिंदे यांची उस्मानाबादचे नवीन पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
नीवा जैन यांची पदोन्नतीने पदस्थापना अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग, नागपूर शहर येथे गेल्या आहेत. तर पोलिस उपायुक्त नागपूर शहर चे अक्षय शिंदे यांची उस्मानाबादचे नवीन पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
अक्षय शिंदे हे २०१४ च्या बॅचचे आय पी एस अधिकार असून त्यांनी यापूर्वी राज्य राखीव पोलीस दलाचे जालना अधिक्षक, नांदेडचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक, अहमदनगर येथे पोलिस उपाधिक्षक म्हणून काम पाहिले आहे.