Views


*डॉ. आंबेडकर जयंतीत सहभागी झालेल्या लहान मुली-महिलांना २ हजार थंड कोल्ड्रिंक वाटप* 

*आ.राणाजगजिंतसिंह पाटील व खा.ओमराजे निंबाळकर यांनीही दिली कार्यक्रम स्थळी भेट.*


कळंब/प्रतिनिधी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त व्हि. एस. पँथर संघटनेकडून छत्रपती शिवाजी महाराज चौक कळंब येथे भव्य स्टेज उभारण्यात आले होते. सकाळी माजी आमदार दयानंद गायकवाड, कुंदन गायकवाड, माजी नगरसेवक सुनिल गायकवाड, डि जी हौसलमल, यांच्या प्रमुख उपस्थितीत बुध्द वंदना घेवून अभिवादन करण्यात आले. या वेळी दलित चळवळीतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

तुळजापूर मतदार संघाचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील कळंब येथे आले असता त्यांनी व्हि.एस. पँथर्स संघटनेने उभारलेल्या स्टेज ला भेट देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले व आयोजकांनी घेतलेल्या कर्यक्रमाचे कौतुक केले. यावेळी त्यांचा सोबत भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी नगर सेविका सरला सरवदे, कळंब तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते. 

खासदार ओमराजे निंबाळकर कळंब मध्ये आले असता त्यांनी सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले व समोरील व्हि. एस. पँथर्स संघटनेने उभारलेल्या स्टेज ला भेट घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी त्यांच्या सोबत आमदार कैलास घाडगे पाटील, कळंब तालुकाध्यक्ष शिवाजी कापसे, सागर बाराते, आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

संध्याकाळी मिरवणुकीत सहभागी झालेल्या लहान मुली व महिलांना२ हजार थंड कोल्ड्रिंक वाटप करण्यात आले. 
हा कार्यक्रम कळंब तालुकाध्यक्ष आकाश गायकवाड, यांनी आयोजित केला होता यासाठी त्यांना कळंब शहराध्यक्ष मोजम खान, प्रशांत गायकवाड, अजय कांबळे, राहुल मुळे आदींनी सहकार्य केले.

 
Top