Views


*येडश्वरी देवीच्या यात्रेला शनिवार पासून प्रारंभ*



कळंब/प्रतिनिधी

 तालुक्यातील श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा यात्रेला शनिवार प्रारंभ होत असुन यात्रेच्या अनुषंगाने भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही, यादृष्टीने प्रशासकीय स्तरावर उपाय योजना करण्यात आल्या आहेत. श्री येडेश्वरी देवीची यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले. या यात्रेला लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होत असतात त्यामुळे यात्रेचा जिल्हा प्रशासनावर मोठा ताण पडतो.

शनिवार १६ रोजी येडेश्वरी देवीच्या यात्रेला पोर्णिमा व दुसऱ्या दिवशी होणाऱ्या चुना वेचण्याच्या कार्यक्रमाला लाखो भाविकांना येतात. त्यामुळे भाविकांना सुखसोई पुरवण्यासाठी प्रशासनाकडून विविध स्तरावर तयारी केले आहे. जिल्हा पोलिस प्रशासनाकडून यात्रेत वाहतूकीची कोंडी होऊ नये यासाठी जड वाहनांसाठी बाह्यवळण व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी ४४ पोलिस अधिकारी, ३५० पुरुष पोलिस कर्मचारी,१५० महिला पोलिस कर्मचारी,१५० पुरुष होमगार्ड,१५० महिला होमगार्ड असा तगडा बंदोबस्त लावण्यात आला असून ग्रामसुरक्षा दलाच्या तुकडीला पाचारण करण्यात येणार असल्याचे पोलिस उपविभागीय अधिकारी एम.रमेश यांनी सांगितले.

आरोग्य विभाकडून भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने देवीच्या मंदिरा परिरात २,मंदिरात १,आमराई मंदिर परिसरात २ असे ५ आरोग्य बुथचे नियोजन करण्यात आले आहे. या कामी जिल्ह्यातील ४० कर्मचारी नेमणुकीपैकी १० डॉक्टर,महिला डॉक्टर १० आरोग्य सेवक,सेविका,१० बहुउद्देशीय कर्मचारी,५ शिपाई,कर्मचारी रुजू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी सुधाकर बिराजदार यांनी सांगितले. ग्रामपंचायतीकडून यात्रा काळात पिण्याच्या पाण्याचे २५ टँकर १ अग्निशामक बंब,मंदिर मार्ग,गावात पथ दिवे पाणीपुरवठा कायम करण्याची तयारी केली आहे. देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शन रांगेची एकेरी व्यवस्था,गर्दीत चोरीचे प्रकारार नियंत्रन ठेवण्यासाठी मंदिर परिसर दत्त कल्लोळ परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. दर्शन रांगेसाठी,पालखी सोहळा संरक्षणासाठी ७५ स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे.

यात्रेसाठी येणारे भाविक मोठया प्रमाणात एसटीने येतात. सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला असून कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्याने बसेसची सोय यात्रेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात होणार आहे. यात्रेत भाविकांना प्रवासासाठी गैर सोय होणार नाही या साठी चारी दिशेने जाणाऱ्या भाविकांसाठी चार यात्रा शेडचे (बसस्थानक) नियोजन केले आहे. बार्शी मार्गे पुणे, मुंबई जाणाऱ्यासाठी बार्शी येडेश्वरी मंदिर रस्त्यावर एक शेड,सोलापूर लातुर उस्मानाबाद कडे जाणाऱ्या भाविक साठी बीएसएनएल उपकेंद्राजवळ एक शेड, भूम, नगर, बीड औरंगाबाद कडे जाणाऱ्या भाविकांसाठी राष्ट्रीय महामार्गावरील बीज गुणन केंद्राजवळ एक शेड ,तर केज, धारुर अंबाजोगाई कडे जाण्याऱ्या भाविकांसाठी चौरस्त्यावरील कळंब रोडच्या पश्चिम बाजूच्या शेतात एक शेड असे नियोजन करण्यात आले आहे.

उस्मानाबाद विभागाने १५० ,बीड ८०,लातूर ५० तर बार्शी आगाराच्या २०,कुर्डुवाडी, करमाळा आगाराच्या प्रत्येकी ५ गाड्या यात्रेच्या व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना प्रवासासाठी करण्यात आलेले यात्राशेड व्यवस्था समजावी म्हणून मंदिर, आमराई, चुन्याचेरान, गावतील मुख्य रस्ते, चौका चौकात दिशादर्शक फलक लावले आहेत असे जिल्हा वाहतूक अधिकारी अश्वजित जानराव यांनी सांगितले. शनिवार पासून यात्रेला सुरुवात होत आहे. यात्रेसाठी विविध व्यासायिकांनी तयारी केले असुन यात्रा दोन वर्षानंतर होत असल्याने बाहेर गावचे विविध व्यवसायिकाने आपली दुकाने थाटली आहेत. मनोरंजनाचे रहाट पाळणे, ब्रेकडान्स गाड्या, रेल्वे, लहान पाळणे, अर्धझुले, हॉटेल, खानावळी, रसवंती, फळाची दुकाने, खेळण्याची दुकाने ,भांड्याची दुकाने, आईस्क्रीम पार्लर, ज्वेलरी, कपडे, बॅग पर्सची दुकाने, नारळ विक्रेते, मोठया प्रमाणात दाखल झाले आहेत.
 
Top