Views


*शिव-भीम जन्मोत्सवाच्या वतीने राष्ट्रीय गायिका सीमा पाटील व ज्वाली मोरे यांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन*


कळंब/प्रतिनिधी


 एक निळा आणि एक भगवा ....दाही दिशांमध्ये लावी दिवा ....एक वाघाचा अन एक सिंहाचा छावा ....जिजाईचा तो शिवा अन भिमाईचा तो भिवा ह्या प्रबोधनात्मक गाण्याने अख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या राष्ट्रीय गायिका सिमा पाटील व ज्वाली मोरे मुंबईकर ह्या दि.१२ एप्रिल २०२२ रोजी कळंब शहरात प्रबोधनात्मक गायनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त की,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती उत्सवानिमित्त शिव-भिम जन्मोत्सव कळंब-२०२२ च्या वतीने दि.१२ एप्रिल २०२२ रोजी सायं.६.०० राज्यात प्रसिध्द असणाऱ्या शाहीर सिमा पाटील यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर,आमदार कैलास पाटील,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बीडचे माजी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे,शिवसेनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी कापसे,संपादक चेतन शिंदे हे उपस्थित राहणार आहेत.
 या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून माजी नगर परिषद उपाध्यक्ष मूस्ताकभाई कुरेशी व रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा उपाध्यक्ष विठ्ठल मामा समुद्रे हे राहणार आहेत.तर या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्यायचे मराठवाडा अध्यक्ष प्रा.डॉ.संजय कांबळे, माजी शहराध्यक्ष प्रा.डॉ.बाळकृष्ण भवर,विष्णुपंत ठोंबरे,प्रा.आसेफ कुरेशी, हामीदभाई कुरेशी,भारत जाधव,अकबर मनियार,संतोष धस,गौस भाई कुरेशी व भीमराव हौसलमल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. 
शहरातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल हजारे व उद्दोजक अभिजित हौसलमल यांनी केले आहे.

 
Top