Views


*शिराढोण येथील चोरीप्रकरणातील तिसरा आरोपी पोलिसांनी केली अटक*

*आणखीन दोघांचा शोध सुरू*


कळंब/प्रतिनिधी 

तालुक्यातील शिराढोण येथील दि २६ मार्च च्या राञी घडलेल्या अनेक दुकानाच्या चोरी प्रकरणातील आणखीन एका तिसऱ्या आरोपीस शिराढोण पोलिसांनी दि ८ एफ्रिल रोजी कळंब येथुन ताब्यात घेतले असुन त्याच्याकडून चोरीतील काही माल पोलिसांनी  हस्तगत केला आहे तर सदरील आरोपीने आणखीन दोघे जण या चोरीच्या घटनेमध्ये सामील असल्याचे सांगीतले तर शिराढोण पोलिसांनी आत्तापर्त या चोरी प्रकरणातील तीन आरोपीना पकडून चोरीचा माल हस्तगत केला आहे तर आणखीन दोन आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत पोलिसांच्या या कामगीरीमुळे कौतुक होत आहे 


पोलिस सुञाकडून मिळालेली माहीती अशी की कळंब तालुक्यातील शिराढोण येथे दि २६ मार्च रोजी राञी शंभुराजे महाजन यांचे कपडयाचे दुकान महेश जाधव यांचे मेडीकल व शेख शौकत छोटुमिया यांचे मल्टीसव्हीस दुकान फोडुन चोरटयांनी मुद्देमाल लंपास केला होता या चोरीप्रकरणातील दोन आरोपीना शिराढोण पोलिसांनी अवघ्या १२ तासाच्या आतच आरोपी पिन्टु माणीक काळे बबलु नाना काळे यांना शिराढोण येथुन ताब्यात घेतले त्यांना कळंब न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती ' 

आणखीन याच चोरी प्रकरणातील अल्पवयीन आरोपी कळंब येथे येणार असल्याची माहीती पोलिसांना मिळाली पोलिसांनी तात्काळ दि ८ एफ्रिल रोजी सापळा रचुन आरोपी बबलु उर्फ टिन्या विनायक पवार ( वय १७ रा कळंब ) यास ताब्यात घेण्यात आले व त्याच्या कडून चोरीतील जिन्स पँन्ट बाँडी स्पे मोबाईल चार्जर ताब्यात घेण्यात आले तर आणखीन दोन आरोपी या चोरीमध्ये सहभागी असल्याचे सदरील आरोपीने पोलिसांना सांगीतले असल्यामुळे शिराढोण  पोलिस त्या दोन आरोपीचा शोध घेत आहेत तर शिराढोण पोलिसांनी चोरीतील तीन आरोपीना पकडुन त्याच्याकडून चोरीचा माल हस्तगत केल्यामुळे शिराढोण पोलिसांचे कौतुक होत आहे . मा सहा.पोलीस अधीक्षक एम रमेश यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक वैभव नेटके व शिराढोन पोलीस स्टॉप आणि पुढील तपास बीट जमादार शौकत पठाण हे करत आहेत 

 
Top