*कपड्याचे दुकान, मेडिकल शॉप व मोबाईल शाॅपी फोडणारे चोरटे अवघ्या 12 तासांच्या आत शिराढोण पोलिसांच्या ताब्यात.*
कळंब/प्रतिनिधी
तालुक्यातील शिराढोण येथील कपड्याचे दुकान,मेडिकल शॉप,मोबाईल शॉपी,फोडून चोरट्यांनी एकूण 52,200 रुपायाचे माल लंपास केला होता.शिराढोण पोलिसांनी तपास चक्र फिरवत 12 तासात चोरट्यांचे मुसक्या आवळल्या.
शिराढोण येथील शंभूराजे सतिश महाराज यांचे कपड्याचे दुकानतील अंदाजे 43000 रुपायचे शर्ट, पँट लंपास केले. तसेच अश्विनी मेडिकल फोडून एनर्जी ड्रिंक चे बाॅक्स व बाॅडी स्प्रे अंदाजे 4000 रुपयांची चोरी करून चोरट्यांनी माल लंपास केले.त्याच रात्री ताजमहाल मल्टी सर्वीस तथा मोबाईल शाॅपी फोडत हेड फोन, मोबाईल चार्जर,यु.एस.बी.वायर असे अंदाजे 5200 माल चोरट्यांनी लंपास करून धुमाकूळ घातला. तीन ही दुकानातील एकूण 52,200 रूपयांचे मुद्देमाल लंपास केला.
या घटनेची गांभीर्याने दखल घेत कळंबचे पोलिस उपविभागीय अधिकारी एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली शिराढोण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक वैभव नेटके यांनी पोलिस उपनिरीक्षक गोडसे, पोलिस नाईक शौकत पठाण,व कर्मचाऱ्यांचे पथक नेमून खाबऱ्याच्या मदतीने माहिती मिळवत रविवार (दि.27) रोजी शिराढोण येथील पारधी पीढी येथे छापा मारून पिंटू माणिक काळे,बबलू नाना काळे, यांना ताब्यात घेत खाक्या दाखवताच दोन्ही आरोपीने.गुन्हा कबूल केला. आरोपी कडून चोरी मधील मुद्देमाल पोलिसांनी जप्त केले. गुन्ह्याचे पुढील तपास पोलीस नाईक शौकत पठाण करीत आहे.